मणेराजुरी, गव्हाण परिसरात दिसलेले गवे विट्याकडे पळाले

The bisons seen in Manerajuri, Gawhan area ran towards Vita
The bisons seen in Manerajuri, Gawhan area ran towards Vita
Updated on: 

तासगाव : मणेराजुरी (ता. तासगाव, जि. सांगली) येथे रविवारी दिसलेले दोन गवे विटा परिसराकडे गेल्याचा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. काल दिवसभर मणेराजुरी, गव्हाण परिसरात वन विभागाचे पथक गव्यांच्या शोधात होते. कळपातून भरकटलेले हे गवे असावेत अशी माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली. 

मणेराजुरी, गव्हाण रस्त्यावर जमदाडे मळा परिसरात काल एका वेळी दोन गवे एका द्राक्ष बागेत काम करणाऱ्या शेतमजुरांना दिसले. त्यांना हाकलून देण्याच्या प्रयत्नात घाबरलेल्या गव्यांनी द्राक्ष बागांत धुमाकूळ घालत पलायन केले. या भागात गवे आल्याची माहिती वन विभागाला कळवल्यानंतर पायांच्या ठशांची पाहणी केल्यानंतर ते गवे असल्याचे स्पष्ट झाले.

रात्री उशीरापर्यंत वनक्षेत्रपाल के. एच. भोसले, वनपाल जे. एम. गुजले यांच्यासह पथकाने मणेराजुरी, गव्हाण, वज्रचौंडे भागात शोध घेतला. मात्र कोठेही गवे आढळून आले नाहीत. आज या भागात गवे दिसल्याची कोणतीही माहिती मिळाली नाही. 

दरम्यान वनक्षेत्रपाल भोसले यांनी आज हे दोन्ही गवे विटा परिसरात गेले असल्याची माहिती मिळत असल्याचे सांगितले. अन्नाच्या शोधात हे गवे कळपातून भरकटले असण्याची शक्‍यता त्यांनी व्यक्त केली.

यापूर्वी तासगाव तालुक्‍यातील वायफळे, सावर्डे, परिसरातही गवा आढळला होता. हे गवे येतात कोठून आणि जातात कोठे हे आजतागायत स्पष्ट झालेले नाही. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Islampur Police Arrest Two Suspects in Alleged Assault Case
Ped Water Shortage
Mumbai Bengaluru Special Train
TET Exemption Plea Rejected
Marathi News Esakal
www.esakal.com