esakal |  फक्त चर्चाच ! सरपंच काँग्रेसचा मात्र अभिनंदनाचे बॅनर लावले राष्ट्रवादी आणि भाजपने
sakal

बोलून बातमी शोधा

BJP and NCP congratulates Congress sarpanch in Sangli

रामापूर, ता. कडेगाव येथे ग्रामपंचायतीत काँग्रेसची सत्ता आली. काँग्रेसला 6 तर भाजप राष्ट्रवादीला 3 जागा मिळाल्या. सरपंचपदी काँग्रेसचे शंकर माळी तर उपसरपंचपदी गणेश गवळी यांची निवड झाली.

 फक्त चर्चाच ! सरपंच काँग्रेसचा मात्र अभिनंदनाचे बॅनर लावले राष्ट्रवादी आणि भाजपने

sakal_logo
By
स्वप्नील पवार

कडेगाव: रामापूर, ता. कडेगाव येथे ग्रामपंचायतीत काँग्रेसची सत्ता आली. काँग्रेसला 6 तर भाजप राष्ट्रवादीला 3 जागा मिळाल्या. सरपंचपदी काँग्रेसचे शंकर माळी तर उपसरपंचपदी गणेश गवळी यांची निवड झाली. या निवडीनंतर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरपंच आणि उपसरपंच यांना शुभेच्छा देणारा बोर्ड लक्षवेधी ठरत आहे.

काँग्रेसच्या एका गटाने शंकर माळी यांना सरपंचपदी निवड होण्यास विरोध केला होता. मग त्यांना व उपसरपंच गणेश गवळी यांना क्रांतीचे संचालक अंकुश यादव,पोपट शिंदे  यांनी पाठिंबा दिला. काँग्रेसकडून एकाकी पडलेल्या माळी यांना विरोधकांनी उमदेपणा दाखवत पाठिंबा दिला. आणि त्यांच्या सदस्याच्या बळावर माळी सरपंच झाले..

सरपंच निवडीनंतर विरोधकांनी गावात अभिनंदन करणारे पोस्टर लावले आहे. हे पोस्टर सध्या पंचक्रोशीत चर्चेत आहे. ग्रामपंचायत निवडणूक खूप अटीतटीची झाली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी भाजप युती यांच्यात मोठा संघर्ष झाला होता. पण विरोधकांनी संघर्ष करण्याची भूमिका सोडून देत काँग्रेसकडून एकाकी पडलेल्या शंकर माळी यांना सरपंच बनवले आणि त्याचे पोस्टरही लावले आहे..

"आजवर नेहमी चांगल्या गोष्टीला पाठींबा देत आलो आहे .गावात शांतता असणे आणि योग्य माणसाच्या पाठीशी उभा राहणे ही आमची भूमिका आहे. सत्तेत असणारी लोकांनी गावाला आदर्श बनवण्यासाठी प्रयत्न करावा."

    अंकुश यादव, संचालक क्रांती सहकारी साखर कारखाना