भाजप सरकारला आलाय सत्तेचा माज : विश्‍वजीत कदम... उत्तर प्रदेशातील घटनेचा तीव्र निषेध 

घनश्‍याम नवाथे
Friday, 2 October 2020

सांगली-  उत्तर प्रदेशातील हाथरस येथे पिडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात असताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी जे वर्तन करण्यात आले ते निंदनीय आहे. त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. आज भाजप सरकारमध्ये काहीही होऊ शकते, ते काहीही करू शकतात. त्यांना कोणाची फिकीर नाही. सत्तेचा माज कशाप्रकारे असू शकतो हे उत्तर प्रदेशातील भाजप सरकारमुळे देशासमोर स्पष्ट झाले आहे, अशा शब्दात आज सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम यांनी येथे समाचार घेतला. 

ते म्हणाले,""उत्तर प्रदेशात आज ज्या पद्‌धतीने कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे, लोकशाहीची हत्या होत आहे, त्यामुळे भाजप सरकारला लाज वाटली पाहिजे. तेथील पिडितेच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी एका राष्ट्रीय पक्षाचे नेते जात असताना जो प्रकार घडला तो निंदनीयच आहे. त्यावरून सत्तेचा माज देशासमोर आला आहे. आपल्या देशाची संस्कृती ही महिलांचा सन्मान आणि रक्षण करणारी आहे. उत्तर प्रदेशातील अत्याचाराच्या घटना थांबल्या पाहिजेत. तेथील सरकारने पिडितेच्या कुटुंबियांना तातडीने मदत केली पाहिजे. आज एकाच्या आत्महत्येनंतर सतत चर्चा होत आहे. परंतू उत्तर प्रदेशातील तरूणीवर बलात्कार झाल्यानंतर त्यावर झोपलेले उत्तर प्रदेश आणि केंद्रातील सरकार का बोलत नाही.'' 

ते म्हणाले,""आज फॉरेन्सिक लॅबसारख्या वैद्यक तंत्रज्ञानामुळे दोषींना पकडून कारवाई करू शकतो. कोर्टामध्ये त्यांच्यावर गुन्हा सिद्ध करू शकतो. परंतू उत्तर प्रदेशातील प्रशासन गुन्हेगारांना मदत करते काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यांच्यावर कोणाचे दडपण आहे काय? कोणाची एवढी दहशत आहे, की तेथील गुन्हेगारांना संरक्षण दिले जाते. हे चुकीचे आहे. आज देशात भितीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. ते होऊ नये म्हणून गांधी कुटुंबातील नेते आणि कॉंग्रेस कार्यकर्ते पुढे आले आहेत. माता-भगिनी आणि नागरिकांना संरक्षण देण्यासाठी निश्‍चितपणे लढाई लढू.'' 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP government has come to power: Vishwajeet Kadam. Strong protest against the incident in Uttar Pradesh