सत्ताबदलानंतर भाजपचा ऑफलाईन सभेसाठी आग्रह

BJP insists on offline meeting after change of power
BJP insists on offline meeting after change of power
Updated on

सांगली  : महापालिकेच्या सत्ताबदलानंतर भाजपचे सदस्य ऑफलाईन सभेसाठी आग्रह धरू लागलेत. लवकरच नगरसेवकांचे एक शिष्टमंडळ नगरविकास सचिवांनाही भेटणार आहे. महापालिकेच्या सभागृहात तितक्‍याच सदस्य नागरिकांच्या उपस्थितीत बरेच कार्यक्रम होत असले तरी महासभेत मात्र कोरोना विषाणू शिरण्याच्या भितीने ऑनलाईन महासभा होत आहेत. 

महापौर निवडीची सभाही ऑनलाईन झाल्यानंतर घडलेल्या महाभारतानंतर भाजपला आता प्रत्यक्ष सभेची खूपच गरज वाटू लागली आहे. भाजपचे गटनेते विनायक सिंहासने म्हणाले,""यापूर्वीही प्रत्यक्ष सभा व्हावी यासाठी प्रयत्नशील होतो. संसदीय कामकाज, विधीमंडळाचे अधिवेशन कोरोनाबाबतची योग्य ती दक्षता घेऊन सभागृहात होत आहे. 

जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका, जिल्हा प्रशासनाच्या सभा, बैठकाही ऑफलाईन पद्धतीने होत आहेत. परंतु, महापालिकेची महासभा मात्र ऑनलाईन पद्धतीनेच आयोजित होत नाही. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर मांडणी करताना अनेकवेळा तांत्रिक अडथळे येतात. एखाद्या विषयाला लोकप्रतिनिधींचा विरोध असेल तर त्यावर सविस्तर चर्चा न होता, घाईगडबडीने विषय मंजूर केला जातो. सामाजिक अंतर ठेवून सभा घेण्याबाबत प्रशासनाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सभेसाठी आम्ही आता प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत.'' 

भाजपच्या सर्व नगरसेवकांचे पत्र घेऊन महापालिकेची सभा ऑफलाईन घ्यावी, यासाठी लवकरच नगर सचिवांची भेट घेतली जाणार आहे. त्यांना ऑनलाईन महासभा घेण्यात येणाऱ्या अडचणींची माहिती दिली जाईल. विधानसभा होत असेल तर महासभा का नको? 
- विनायक सिंहासने, गटनेते भाजप 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Almatti Hippargi Dam Water Storage
ethanol petrol causing bike engine problems
Forest Department leopard rescue operation
Chandoli Dam rainfall update today
Marathi News Esakal
www.esakal.com