कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यांनी फिरवली चंद्रकांतदादांकडे पाठ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. परंतु, त्यांच्या विजयाचं कोल्हापुरात अपेक्षित सेलिब्रेशन झालं नाही, याची सध्या चर्चा आहे.

कोल्हापूर - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. परंतु, त्यांच्या विजयाचं कोल्हापुरात अपेक्षित सेलिब्रेशन झालं नाही, याची सध्या चर्चा आहे. 

विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर चंद्रकांत पाटील दिवाळीत कोल्हापुरात होते. 

कोथरूड मतदारसंघातील विजयानंतर प्रथमच चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर दौऱ्यावर आले. रेल्वे स्थानकावर त्यांचे आगमन झाले. मात्र भाजपचे नेते, कार्यकर्त्यांनी मात्र आज पाटील यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरविली. एरवी चंद्रकांत पाटील कोठेही असले, घर, सर्किट हाऊस, रेल्वे स्थानक तेथे  नेते आणि कार्यकर्ते त्यांना गराडा घालायचे. पण, दिवाळीत मात्र कोणीच आले नसल्याने स्वतः चंद्रकांत पाटील यांना खंत व्यक्त केली. 

खासदार मंडलिकांवर आरोप
दरम्यान, विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी अक्षरक्षः पक्षनिष्ठा गुंडाळून सोयीचे राजकारण केले. ते ज्या कॉंग्रेसी संस्कारातून आले, त्याप्रमाणे त्यांनी पाडापाडीचे राजकारण करून आपली सोय पाहिली आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. तसेच एवढी कामे केल्यानंतरही आमचं काय चुकलं? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेला विचारला आहे. 

'समरजित घाटगेंनी ऐकले नाही'
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने घाईगडबडीने संजय घाटगेंना उमेदवारीचा ए.बी. फॉर्म दिला. बातम्या आल्यानंतरच आम्हाला संजय घाटगेंना उमेदवारी मिळाल्याचे कळले. त्यामुळे समरजित घाटगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करुनही त्यांनी आमचे ऐकले नाही. त्यांना आम्ही दोन दिवस थांबवून संजय घाटगे व समरजित घाटगे यांच्यात समन्वय घडविण्याच प्रयत्न केला होता; पण त्याला मंडलिकांनीच दाद दिली नाही, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी दिवाळीतील पत्रकार परिषदेत केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader chandrakant patil got less support by bjp workers in kolhapur