सांगली : ‘‘पहलगाम येथे दहशतवाद्यांनी धर्म विचारून निष्पाप लोकांची हत्या केली. त्यांना भारताने घुसून उत्तर दिले आहे. महाराष्ट्रातही काही लोक जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रकार करत आहेत. आम्ही कुणाच्या धर्माविरोधात नाही. मात्र हिंदूंवर (Hindu) अत्याचार, देवदेवतांचा अपमान करीत असेल तर ते सहन केले जाणार नाही,’’ असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दिला. यावेळी ‘बाळूमामा आमचा आत्मा असून धनगरी ढोल अस्मिता आहे,’ असे स्पष्ट केले.