

Political negotiations intensify ahead of Sangli mayor election.
sakal
सांगली : महापौर निवडणुकीसाठी भाजपकडून वेगवेगळ्या पर्यायांची जुळवाजुळव सुरू आहे. त्यात आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची भर पडली आहे. भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने राष्ट्रवादीतून विजयी झालेल्या तीनपैकी एका हिंदुत्ववादी विचारांच्या नगरसेवकाशी संपर्क साधला असून असे समीकरण अस्तित्वात आले तर अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर रोखता येईल, असा भाजपमध्ये विचार प्रवाह आहे.