आण्णांच्या आंदोलनामुळे भाजप सत्तेत - गिरीश महाजन

girish-mahajan
girish-mahajan

राळेगणसिद्धी - जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी 2011 मध्ये दिल्ली येथील रामलीला मैदानावर भष्टाचार विरोधी जन आंदोलन केले. त्याला देशभरातून अभूतपुर्व प्रतिसाद मिळाला आणि संपूर्ण देश भ्रष्टाचाराच्या विरोधात प्रेरीत झाला. म्हणून 2014 मध्ये आम्ही सत्तेवर आलो हे आम्हाला माहीत आहे. अशी प्रांजाळ कबुली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. राळेगणसिद्धी येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत महाजन बोलत होते.  

गांधीचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कटीबद्द आहेत. त्यांनी गरीबांच्या घरात गॅस पोचविला आहे. लवकरच प्रतेकाला घर मिळणार आहे. देश भ्रष्टाचार मुक्त करण्याचे स्वप्न मोदींचे आहे. आम्ही अत्ताच सत्तेवर आलो आहोत लोकपाल कायदा यावा यासाठी 60 ते 70 वर्ष गेली आहेत. हा कायदा झाला आहे. लवकरच त्या कायद्यानुसार त्यांच्या नेमणुकाही होतील. त्यामुळे या पुर्वीच्या मनमोहन सिंग सरकरला जसे जावे लागले तशी वेळ आमच्या सरकारवर येणार नाही असेही महाजन यावेळी बोलताना म्हणाले. 

तसेच येथील ग्रामसभा एक विशेष असा अनुभव देणारी ठरली असेही ते म्हणाले. कारण मला वाटले ग्रामसभा आहे म्हटल्यावर मोठा भव्य मंडप असेल मात्र निर्सगाच्या सान्निध्यात व मोठ्या झाडा खाली ती असल्याचे पाहील्यावर खूप समाधान वाटल्याचे त्यांनी नमुद केले. 

यावेळी बोलताना आण्णा हजारे म्हणाले, आपण गांधीजींची 150वी जयंती साजरी करत आहोत. त्या निमित्ताने राज्य सरकारने किमान राज्यात राळेगणसिद्धी व हिवरे बाजारसारखी 50 गावे निर्माण करावीत म्हणजे खरी गांधी जयंती साजरी केल्याचे सार्थक होईल. देशात स्वयंपूर्ण गावे होणे गरजेचे आहे. शहरी प्रगती ही विनाशाकडे नेणारी आहे. ती निर्सर्गाचे प्रकृतीचे शोषण करणारी आहे. गावे बदलल्याशिवाय देश बदलणार नाही आणि देशाची अर्थव्यस्थाही बदलणार नाही असेही शेवटी हजारे म्हणाले. 

यावेळी उपसरपंच लाभेश औटी यांनी हजारे यांनी या पुढील काळात आंदोलन करावे परंतु, ऊपोषण करू नये असा ठराव यावेळी मांडला. हा ठराव टाळ्याच्या गजरात मंजूर करण्यात आला. 

या ग्रमासभेचे प्रास्ताविक सुरेश पठारे यांनी तर सुत्रसंचलन सुभाष पठारे यांनी केले. गांधी जयंतीनिमित्ताने येथील संत निळोबाराय विध्यालयाच्या एन.सी. सी. च्या मुलांनी गावातील स्वच्छाता करूऩ हातात स्वच्छतेचे संदेश देणारे फलक घेऊन गावातून प्रभात फेरी काढली व जनजागृतीही केली.

ग्रमसभेत उप जिल्हाधिकारी प्रशांत पाटील, सरपंच प्रभावती पठारे, उपसरपंच लाभेश औटी, सुरेश पठारे, शाम असावा, तहसीलदार गणेश मरकड, पोलिस निरीक्षक हनुमंतराव गाडे, दादा पठारे, माजी सरपंच जयसिंग मापारी, दत्ता आवारी आदी मान्यवर ऊपस्थीत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com