दाऊदऐवजी भाजपने पाकिस्तानमधून साखर आणली - बच्चू कडू

तात्या लांडगे
मंगळवार, 19 जून 2018

सोलापूर : साखरेचे दर घसरल्याने कारखान्यांकडून साखर विक्री केली जात नाही. त्यामुळे सुमारे पाच कोटी रुपयांची एफआरपी कारखान्यांकडे थकली आहे. दुसरीकडे मात्र भाजपने पाकिस्तानमधून दाऊदला आणण्याऐवजी शहीदांचे रक्‍त लागलेली साखर आयात केली. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांचे सरकारला काहीच देणेघेणे नसल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत केला. 

शहर व जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांसंबंधी महापालिका आयुक्‍त, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेण्याकरिता आमदार कडू सोलापुरात आले होते. तत्पूर्वी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपवर टिकास्त्र सोडले. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे अजित कुलकर्णी, दत्ता मस्के, केदार सौदागर, जमीर शेख, आबा आदलिंगे, अनिकेत होमकर, खलीद मनियार आदी उपस्थित होते. 

आमदार कडू पुढे म्हणाले, सध्या तुरीला बाजारात प्रतिक्‍विंटल 3 हजार 300 रुपये दर असून त्यामध्ये सरकार एक हजार रुपयांचे अनुदान देणार आहे. तरीसुध्दा हमीभावापेक्षा किमान एक हजार रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागणार आहे. हमीभावापेक्षा कमी किमतीने तूर, हरभरा विकू नये असे आवाहन शेतकऱ्यांना करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरविल्याचेही त्यांनी सांगितले. दूधाचे दर गडगडले आहेत, त्याकडे दुग्धविकासमंत्र्याचे लक्ष नाही, अशी टिकाही त्यांनी केली. 

दिव्यांगासाठी राज्यातील एकूण उत्पन्नाच्या तीन टक्‍के निधी खर्च करण्याची तरतूद आहे. तरीदेखील खर्च करण्यात येत नाही. महापालिकेसह अन्य शासकीय विभागांमध्ये दिव्यांगासाठीच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. अन्यथा शासकीय अधिकाऱ्यांविरोधात तीव्र आंदोलन करु. 
- बच्चू कडू, आमदार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp purchase the sugar instead of daaud