Sangli Election : चार जागांवरून तुटली भाजप-शिवसेना युती; सांगलीत राजकीय समीकरणे कोलमडली
BJP–Shiv Sena Alliance : अवघ्या चार जागांवरून सुरू असलेली जागावाटपाची कोंडी अखेर भाजप-शिवसेना युती तुटण्यास कारणीभूत ठरली,केंद्रीय व राज्य पातळीवरून युती टिकवण्याचे प्रयत्न होऊनही स्थानिक वाद आणि इच्छुकांची संख्या आडवी आली
सांगली : भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती होणार, हे जवळपास निश्चित मानले जात होते. आधी दोन गटांतील वादातून, त्यानंतर दोन पक्षांच्या जागावाटपातून केवळ चार जागांसाठी युती तुटली.