वीजबिल कट करणाऱ्यास भाजप जोड्यानेच मारणार

अजित झळके
Friday, 22 January 2021

कोरोनाच्या काळातील वीजबिल माफ करू, असे आश्‍वासन देऊन पलटी खाणाऱ्या राज्य सरकारने आता थकबाकीपोटी वीज कनेक्‍शन तोडले जाईल, असा इशारा दिला आहे.

सांगली : कोरोनाच्या काळातील वीजबिल माफ करू, असे आश्‍वासन देऊन पलटी खाणाऱ्या राज्य सरकारने आता थकबाकीपोटी वीज कनेक्‍शन तोडले जाईल, असा इशारा दिला आहे.

कोरोनाच्या काळात सर्वांचीच परिस्थिती बिकट बनली होती. त्याचा विचार न करता शासनाने वीज कनेक्‍शन कट करण्याचे दिलेले आदेश तुघलकी आहेत. त्यामुळे वीज कनेक्‍शन कट करायला येणाऱ्यास भाजप जोड्याने मारेल, असा इशारा भाजपचे संघटन सरचिटणीस दीपक माने यांनी पत्रकार बैठकीत दिला.

ते म्हणाले,""या आंदोलनासाठी वीस जणांची टीम तयार केली आहे. कोरोनामुळे सर्वांचीच अवस्था बिकट झाली होती, त्यातच विजेची अव्वाच्या सव्वा बिले आली आहेत. राज्य सरकारने या काळातील बिले माफ करणार असल्याचे सांगितले होते.

अडचणीच्या काळात जनतेला आधार व मदतीची गरज असताना शासनाने थकबाकी असणाऱ्यांचे वीज कनेक्‍शन कट करण्याचे आदेश दिले आहेत. जखमेवर मीठ चोळले आहे. ही हुकूमशाही आहे. मोदी सरकारने सर्वांना या काळात धान्य व पैसे दिले. त्याप्रमाणे राज्य सरकारनेही जनतेला दिलासा द्यावा.'' 

ते म्हणाले,""आमच्या टीममध्ये दीपक माने, श्रीकांत वाघमोडे, राजू जाधव, अमित भोसले, राहुल माने, प्रियानंद कांबळे, ज्योती कांबळे, माधुरी वसगडेकर, संगीता जाधव, प्रथमेश वैद्य, अक्षय पाटील, सचिन ओमासे, राजू मद्रासी, सागर इरकर, अनिकेत खिलारे, अण्णासाहेब वडर, संदीप थोरात, गिरीश रणखांबे, राहुल रुपनर, कार्तिक मोरे यांचा समावेश आहे.

वीज कनेक्‍शन कट करू नये यासाठी आम्ही वीज वितरणच्या अधीक्षक अभियंता याना निवेदन दिले. तरीही वसुलीची सक्ती झाली तर पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवून. त्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही.'' 

संपादन :  युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP will kill those who cut electricity bills in pairs in Sangali