esakal | भाजपच्या 36 सदस्यांचे खरे क्‍लबमधून मतदान 
sakal

बोलून बातमी शोधा

BJP's 36 members cast their votes from the true club

महापालिकेतील भाजपच्या 36 सदस्यांनी खरे क्‍लब येथून महापौर, उपमहापौर निवडीच्या ऑनलाईन सभेत मतदान केले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, सम्राट महाडिक, सी. बी. पाटील आदी उपस्थित होते. 

भाजपच्या 36 सदस्यांचे खरे क्‍लबमधून मतदान 

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : महापालिकेतील भाजपच्या 36 सदस्यांनी खरे क्‍लब येथून महापौर, उपमहापौर निवडीच्या ऑनलाईन सभेत मतदान केले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, सम्राट महाडिक, सी. बी. पाटील आदी उपस्थित होते. 

भाजपचे 26 सदस्य चार दिवस सहलीवर होते. ते काल (सोमवारी) कोल्हापूरमध्ये दाखल झाले होते. तसेच सांगलीतील दहा सदस्य त्यांना मिळाले. सर्वजण आज सकाळी कोल्हापूरमधून एकत्रच सांगलीत खरे क्‍लब येथे पोहोचले. त्यानंतर तेथेच थांबून त्यांनी महापौर, उपमहापौर निवडीच्या ऑनलाईन मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. हे सदस्य मोबाईलवरुन सभेत उपस्थित झाले. एका मोठ्या स्क्रीनवर सर्वांनाच मतदान प्रक्रिया पाहण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. 

निकालानंतर गेली अडीच वर्षे सत्तेत असलेल्या भाजप सदस्यांची आज सत्ता गेल्यानंतर नाराजी पसरली होती. खरे क्‍लबमध्ये शांतता पसरली होती. सभागृहात उपस्थित असलेले धीरज सूर्यवंशी आणि गजानन मगदूम हेही खरे क्‍लबमध्ये दाखल झाले होते. 

शेखर इनामदारांचे डोळे पानावले 
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेची जबाबदारी सोपवलेले प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि स्वीकृत नगरसेवक शेखर इनामदार यांना आज सत्ता गमावल्यानंतर हुंदका अनावर झाला. खरे क्‍लबमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सदस्यांशी बोलताना इनामदार यांचे डोळे पानावले. आपल्याच काही नगरसेवकांनी दगा दिला. त्यांच्यावर मी विश्‍वास ठेवला होता. काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महापालिका प्रमुख पदाचा राजीनामा चंद्रकांतदादांकडे देणार असल्याचे त्यांनी सदस्यांना सांगितले. 


संपादन : प्रफुल्ल सुतार