कोरोनाच्या नावाखाली काळाबाजार ः टोमॅटाेचे रुपया किलाेने लिलाव... शेतकऱ्यांची लूट आणि ग्राहकांची फसवणूक

दौलत झावरे
बुधवार, 25 मार्च 2020

काेराेना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सर्वांना फटका बसलेला आहे. सर्व व्यवहार बंद झालेले आहेत. सध्या राज्यात संचार बंदी आदेश लागू केलेला असल्याने ट्रान्सपाेर्ट बंद झालेले आहेत. बाजार समित्यांमध्ये शेतीमाल खऱेदीसाठी बाहेरील राज्यातून येणार्या व्यापार्यांची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे शेतीमालाला उठाव नसल्याने भावात घसरण झालेली आहे.

नगर ः  काेराेना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वच ठिकाणचे व्यवहार ठप्प झालेले आहेत. ट्रान्सपाेर्ट बंद झाल्यामुळे शेतीमालाला मागणी कमी झाल्याने त्याची कवडीमाेल भावाने विक्री हाेत आहे.

नगर बाजार समितीमध्ये पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी विक्रीस आणलेल्या 40 कॅरेट टाेमॅटाेला एक रुपया किलाेचा भाव मिळाला.
काेराेना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सर्वांना फटका बसलेला आहे. सर्व व्यवहार बंद झालेले आहेत. सध्या राज्यात संचार बंदी आदेश लागू केलेला असल्याने ट्रान्सपाेर्ट बंद झालेले आहेत. बाजार समित्यांमध्ये शेतीमाल खऱेदीसाठी बाहेरील राज्यातून येणार्या व्यापार्यांची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे शेतीमालाला उठाव नसल्याने भावात घसरण झालेली आहे. मागील दाेन वर्षांतील दुष्काळामुळे शेतकरी मेटाकुटीला आला हाेता यंदाच्या वर्षी पावसाने जिल्ह्यातील काही भागात हजेरी लावली. त्यामुळे शेतकर्यांनी कांदा, टाेमॅटाे, भाजीपाला आदी उत्पादन घेतलेले आहेत. मात्र शेतकर्यांच्या या कष्टावर आता काेराेना व्हायरने पाणी फिरवले आहे. शेतीमाल कवडीमाेल भावाने विक्री हाेत आहे. 

पारेनरच्या सभातींनाच आला अनुभव
पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी 40 कॅरेट (800 किलाे) टाेमॅटाे नगर बाजार समितीमध्ये विक्रीस आणले हाेते. टाेमॅटाेला खरेदी करण्यासाठी नगर बाजार समितीमध्ये व्यापारी नसल्याने शेतीमालाला भाव मिळत नव्हता.

सभापती गायकवाड यांच्या टाेमॅटाेला सुमारे एक रुपया किलाे दरानेच भाव मिळाला. टोमॅटाेपाेटी त्यांना एक हजार 95 रुपये मिळाले. त्यातून 180 रुपये हमाली, 60 रुपये ताेलाई, माेटार भाडे 920 रुपये, इतर खर्च पाच रुपये असा एकूण एक हजार 65 रुपये खर्च अाला. त्यातून त्यांना फक्त 30 रुपये शिल्लक राहिलेले आहेत. ही परिस्थिती इतर शेतकर्यांची झालेली आहे. शेती मालाची पड्या भावाने विक्री हाेत असल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे.

नगर बाजार समितीत 40 कॅरेट टोमॅटाे विक्रीस पाठविले हाेते. त्यातील निम्मा माल सुमारे एक रुपया किलाेने विक्रीस गेला. ट्रान्सपाेर्ट हाेत नसल्यामुळे त्यातील निम्मा माल परत पाठविण्यात अालेला अाहे. शेतकर्यांना माल कवडीमाेल भावाने विक्री करावा लागत आहे.
-प्रशांत गायकवाड, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पारनेर.

निराश हाेऊन शेतकरी परत
शेतीमालाला चांगला भाव मिळेल, अशा  आशेने शेतकरी शेतातून माल विक्रीस आणत आहेत. मात्र भाजीपाल्यासह इतर शेत मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी मिळेल तेव्हढे पैसे घेऊन हताश हाेऊन घरी परतत आहेत. काही शेतकर्यांना शेतमाल विक्रीस आणण्याचा खर्चही आज निघाला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Black market under the name of Corona