Blind father's complaint against son
Blind father's complaint against son

मुलगा, सुनेविरुद्ध अंध वडिलांची तक्रार... का?

कडेगाव : आपल्या स्वतःच्या वयोवृद्ध व अंध आई-वडिलांचा सांभाळ करण्यास नकार देऊन त्यांना घरात राहू दिले जात नाही. तसेच शिवीगाळ करून मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याची धक्कादायक प्रकार येथे घडला आहे. याबाबत आई-वडिलांनी स्वतःचा मुलगा व सुनेविरुद्ध कडेगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, येथील खुदबुद्दीन मक्‍तुम काझी (वय 68) हे येथील शिवप्रभू शाळेजवळ येथे स्वतःच्या मालकीच्या घरात पत्नी व मुलगा शफीउल्ला खुदबुद्दीन काझी व सून नफिसा शफीउल्ला काझी यांचे सोबत रहात होते. तर खुदबुद्दीन हे वयोवृद्ध असून अंधही आहे. तसेच त्यांची पत्नी ही वयोवृद्ध आहेत. अशा वार्धक्‍याच्यावेळी त्यांना स्वतःच्या घरी राहणे गरजेचे आहे. परंतु त्यांचा मुलगा शफीउल्ला व सून नफिसा यांनी सन 2014 पासून त्यांना त्रास देण्यास सुरवात केली आहे.

त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये राहणेची नितांत गरज असताना मुलगा व सून हे दोघे त्यांना घरी राहू देत नाहीत तसेच त्यांचा कोणत्याही प्रकारचा योग्य रितीने सांभाळ करण्यास नकार देत आहेत. त्यांना मानसिक व शारीरिक त्रास देत आहेत. तसेच खुदबुद्दीन व त्यांची पत्नी हे सध्या त्यांची मुलगी हिचेकडे रहात आहेत. तरीही मुलगा शफीउल्ला व सून नफिसा हे खुदबुद्दीन व त्यांची पत्नी यांना शिवीगाळ करून त्रास देत आहेत. 

शेवटी त्रासाला कंटाळून खुदबुद्दीन यांनी मुलगा शफिउल्ला खुदबुद्दीन काझी व सुन नफिसा शफिउल्ला काझी यांच्याविरुद्ध कडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी ज्येष्ठ नागरिक कायद्यान्वये शफीउल्ला व नफिसा काझी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक विपीन हसबनीस हे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com