पेड परिसरात बहरलेला मोहोर गळू लागला 

The blossoms that bloomed in the tree area began to rot
The blossoms that bloomed in the tree area began to rot

पेड : गेल्या दोन दिवसांपासून सतत येणारे ढगाळ वातावरण, रिमझिम पडलेला पाऊस यामुळे यंदा आंब्यावर मावा व तुडतुडे या रोगाचा प्रार्दुभाव होऊ लागला असून झाडाचा बहरलेला मोहोर गळून पडू लागला आहे. त्यामुळे पेड परिसरात गावठी तसेच संकरित आंब्याच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याची धास्ती शेतकऱ्यांच्यातून व्यक्त होत आहे. 

तासगाव तालुक्‍याचा पूर्व भाग तसेच पेड परिसरात विशेषत: बांधावर तसेच शेतात शेतकऱ्यांनी गावठी तसेच संकरित आंब्याची झाडे लावली आहेत. या परिसरातील गावठीसह इतर कलमी आंब्यांना मोहोर बहरत असताना तसेच बऱ्याच झाडांना लहान लहान आंबे लागलेले असताना वारा,अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे विविध रोगांचा परिणाम आंब्यावर होणार आहे. परिणामी, फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्यांची चव यंदा काहीशी महागडी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 
आंब्यासाठी ऑक्‍टोबर व नोव्हेंबरपासून थंडी आवश्‍यक असते. तरच आंब्याच्या झाडांना पालवी फुटून मोहोर येतो आणि आंबा पीक वेळेत येते. यंदा पावसाची सुरवात वेळेवर होऊनही दमदार पावसामुळे थंडीचे प्रमाण उशिरा सुरू झाले होते. तसेच थंडीच्या कमी-अधिक लहरींमुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे मागील दोन-तीन दिवसांपासून झालेला हलक्‍या स्वरूपाचा झालेला पाऊस तसेच सातत्याने येणारे ढगाळ वातावरण आदी कारणांमुळे आंब्याचा मोहोर गळू लागला असून भविष्यात आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आंब्याची चव लोकांचा चाखायला मिळते की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. आंबा तयार होण्यास प्रामुख्याने उष्ण हवामानाची गरज असते. 

सद्य:स्थितीत मोहोर व फळधारणेच्या स्थितीत आंबा पीक आहे. अशा वातावरणात कमी- अधिक ढगाळ वातावरण तयार होत असल्याने आंब्यावर मावा, चिकटा, बुरशीजन्य रोग तसेच मोहरावर तुडतुडे, फुलकिडी आदी रोगांमुळे फळ धारणेवर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच, गावठी आंब्याचे झाड आकाराने मोठे असल्याने त्यावर शेतकऱ्यांना फवारणी करणे शक्‍य होत नाही. त्यापेक्षा संकरित कलमी आंब्याची झाडे आकाराने लहान असल्या कारणाने त्यावर फवारणी, काळजी घेणे शक्‍य आहे. मात्र, वातावरणाच्या लहरीपणामुळे त्यांच्याही उत्पादनात घट होण्याची शक्‍यता परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com