मिरज शासकीय रुग्णालयात मृतदेह अंत्यसंस्काराअभावी पडून

प्रमोद जेरे
Tuesday, 11 August 2020

मिरज : शहरातील कोव्हिड रुग्णालयातील अडचणींची मालिका संपता संपेना झाली आहे.

मिरज : शहरातील कोव्हिड रुग्णालयातील अडचणींची मालिका संपता संपेना झाली आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबरच आता कोव्हिडमुळे मृत्यू झालेल्या मृतदेहांच्या अंत्यसंस्कारांच्या मोठ्या दिव्यास पोलिस आणि रुग्णालय प्रशासनाला सामोरे जावे लागते आहे. निधन झालेल्या रुग्णाचे नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी पुढे येत नसल्याने अनेक मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात अंत्यसंस्कारा अभावी अनेक दिवस पडून राहत आहेत. प्रसंगी पोलिसांना यासाठी नातेवाईकांना गंभीर कारवायांचे इशारे दिल्यानंतर नातेवाईक कसेबसे अंत्यसंस्कारासाठी पुढे येत आहेत. आज (सोमवारी) तब्बल नऊ दिवसांनी एका कोव्हीड ग्रस्त महिलेच्या मृतदेहावरील पोलिसांनी अंत्यसंस्कार केले. 

मिरज शासकीय रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांवरील उपचारांसह कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्काराचीही सोय सरकारच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठीची सर्व व्यवस्था पोलिस यंत्रणा आणि महापालिकेकडून केली जाते. मात्र हा अंत्यविधी करताना पोलीस यंत्रणेस कायदेशीर तरतुद रुग्णाच्या नातेवाईकांची उपस्थिती अनिवार्य असते. आज (सोमवारी) रुग्णालयाने पोलिसांनी तब्बल नऊ दिवस शवाघरात ठेवलेल्या मृतदेहाची मृतदेहावर मृतदेहाच्या नातेवाईकांना कारवाईचा इशारा देत अंत्यसंस्कार पार पाडले. 

परंतु गेल्या काही महिन्यात असे सातत्याने घडू लागल्याने पोलीस आणि रुग्णालय प्रशासन नातेवाईकांच्या त्रयस्थपणे वैतागले आहेत. एकीकडे अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहायचे नाही आणि दुसरीकडे रुग्णालय प्रशासन पोलिसांवर आरोप-प्रत्यारोप करून बदनामीचे प्रयत्न नातेवाईकांकडून केला जात आहे.

नेमक्‍या याच किळसवाण्या प्रकारांना पोलीस आणि प्रशासन वैतागले आहे आज तब्बल नऊ दिवस घरात सडत पडलेल्या एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना पोलिसांना या नातेवाईकांना थेट खडक कारवाईचा इशारा द्यावा लागला त्यानंतर हे नातेवाईक मृतदेहावरील अंत्यसंस्काराचा उपस्थित राहण्यास तयार झाले. पण यादरम्यान पोलिस आणि रुग्णालय प्रशासनास बदनामीचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bodies lying in Miraj Government Hospital due to lack of cremation