बेळगाव : मातीच्या ढीगाऱ्याखाली सापडला मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Body found under mound soil construction worker killed others injured

बेळगाव : मातीच्या ढीगाऱ्याखाली सापडला मृतदेह

बेळगाव : नवीन घराचे बांधकाम सुरू असताना शेजारील घराची मातीची भिंत अंगावर कोसळल्याने त्याखाली सापडून एक बांधकाम कामगार ठार तर दोघे जखमी झाले. गुरुवार (ता. २८) सायंकाळी ४.३० च्या सुमारास मारुती गल्ली मारुती मंदिर पाठीमागे असलेल्या वृंदावन हॉटेल नजिक ही दुर्घटना घडली आहे. कल्लाप्पा कऱ्याप्पा होसमणी (वय ६२, मुळ रा.नेरळीकट्टी जि.धारवाड सध्या रा. टिळकवाडी) असे मयताचे नाव असून अर्जून हरिजन, महेंद्र गुडीमनी (दोघेही रा. पट्टीहाळ ता.बैलहोंगल) अशी जखमांची नावे आहेत.

मारुती गल्ली मारुती मंदिरच्या पाठीमागे असलेल्या वृंदावन हॉटेल नजिक जैन यांच्या मालकीच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. तळ घरासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले होते. तसेच आज नवीन घराच्या बांधकामाचे काम सुरू असताना बाजूच्या घराची मातीची भिंत अचानक कोसळली. त्यामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून कल्लाप्पा होसमणी जागीच गाडला गेला तर अर्जून आणि महेंद्र हे दोघे जखमी झाले. ही घटना घडल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.

काही तातडीने ही माहिती पोलिसांना दिली त्यानंतर खडेबाजारचे सहाय्यक पोलीस आयुक्त ए. चंद्रप्पा, पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर घटनास्थळी दाखल झाले. त्यानी एसडीआरएफ, अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देऊन पाचारण केले. त्यानंतर जवानानी ढिगाऱ्याखाली सापडून ठार झालेल्या बांधकाम कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. मातीचे ढिगारे हटउन मृतदेह बाहेर काढण्यात आला. ही माहिती संबंधित मयत बांधकाम कामगाराच्या नातेवाईकांना देऊन बेळगावला पाचारण करण्यात आले.

याप्रकरणी खडेबाजार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन मृतदेह शल्यचिकित्सेसाठी जिल्हा रुग्णालय शवागृहात पाठविला. शहरात सध्या नवीन घरांचे बांधकामांचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तळघरासाठी करण्यात येणारे खोदकाम आता धोकादायक ठरू लागले आहे. त्यामुळे त्याकडे महानगरपालिकेने लक्ष देणे गरजेचे बनले आहे.

Web Title: Body Found Under Mound Soil Construction Worker Killed Others Injured Mud Wall Neighboring House Collapsed Construction New House

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top