esakal | खंडणी प्रकरणी औंधकरसह दोघांना अटक 
sakal

बोलून बातमी शोधा

khandani.jpg

सांगली,  ः कृषी विभागातील खरेदी घोटाळा माहिती अधिकारातून उजेडात आणलेल्या सुयोग गजानन औंधकर (वय 33, कासेगाव) याच्यासह त्याचा सहकारी कृष्णा विश्‍वनाथ जंगम (वय 60, वाळवा) यांना आज खंडणीविरोधी पथकाने अटक केली. श्री. औंधकर संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष आहेत. आत्मा यंत्रणेचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक मुकुंद जाधवर यांनी त्यांच्यासह पत्नीकडून आठ लाखांची खंडणी आणि दरमहा वीस हजारांचा हप्ता मागितल्याची तक्रार केली होती. त्यानुसार कारवाई झाली. 

खंडणी प्रकरणी औंधकरसह दोघांना अटक 

sakal_logo
By
विष्णू मोहिते

सांगली,  ः कृषी विभागातील खरेदी घोटाळा माहिती अधिकारातून उजेडात आणलेल्या सुयोग गजानन औंधकर (वय 33, कासेगाव) याच्यासह त्याचा सहकारी कृष्णा विश्‍वनाथ जंगम (वय 60, वाळवा) यांना आज खंडणीविरोधी पथकाने अटक केली. श्री. औंधकर संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष आहेत. आत्मा यंत्रणेचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक मुकुंद जाधवर यांनी त्यांच्यासह पत्नीकडून आठ लाखांची खंडणी आणि दरमहा वीस हजारांचा हप्ता मागितल्याची तक्रार केली होती. त्यानुसार कारवाई झाली. 

दरम्यान, माहिती अधिकारातून उघड झालेल्या थर्मल स्कॅनिंग यंत्र आणि बॅग खरेदी प्रकरणाची सध्या उच्चस्तरीय चौकशी सुरु आहे. ही खरेदी ज्या कंपनीकडून झाली, त्यात जाधवकर यांची पत्नी संचालिका आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांची पत्नीही संचालक आहे. अशा पद्धतीने खरेदी करणे हा भ्रष्टाचार असल्याचा आरोप औंधकर यांनी केला होता. कृषीमंत्री दादा भुसे यांनी चौकशी आदेश दिले. ती पूर्ण होण्याआधी औंधकरवर गुन्हा दाखल करून अटक झाली. 

पोलिसांनी माहिती दिली, की जाधवर यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली होती. त्यात जाधवर यांना शेतकरी कंपनी स्थापन करून भ्रष्टाचार करीत आहे. हे प्रकरण मिटवण्यासाठी आठ लाख रुपये द्या आणि दर महा 20 हजार रुपये द्या, अशी मागणी केली. त्याची शहानिशा करून औंधकर आणि जंगम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी, या दोघांचा उल्लेख सराईत गुन्हेगार असा केला आहे. औंधकर याच्यावर तीन तर जंगम याच्यावर चार खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. 
पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, प्रवीण शिंदे, सागर पाटील, अमित परीट, बिरोबा नरळे, जितेंद्र जाधव, आर्यन देशिंगकर, सुहेल कार्तियानी यांचा कारवाईत सहभाग होता. तक्रार द्या..! 
संशयितांनी माहिती अधिकाराचा वापर करून कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास नाहक त्रास दिला असेल, तर त्यांनी खंडणी विरोधी पथकास संपर्क साधून तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी केले आहे. 

loading image
go to top