दोन्ही कॉंग्रेस संपर्कातच नाही : राजेंद्र नागवडे

संजय आ. काटे
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

श्रीगोंदे (नगर) : श्रीगोंद्यातून विधानसभा लढण्यास आम्ही तयार आहोत. कॉंग्रेस पक्षाला ही जागा सोडावी, अशी मागणीही नेत्यांकडे केली. मात्र, नेत्यांनी त्यावर साधी प्रतिक्रिया देखील दिली नाही. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस अथवा कॉंग्रेसच्या कोणत्याही नेत्यांने आपणास निवडणुकीबाबत साधा फोन करून चौकशी सुद्धा केली नसल्याची खंत शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केली.

'सकाळ'ची बोलताना नागवडे म्हणाले, ""गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच कॉंग्रेससह राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी संपर्क करून उमेदवारी व प्रचाराचे नियोजन ठरविण्यासाठी अनेक बैठका घेतल्या. त्यामुळे तालुक्‍यात परिवर्तन होताना आमदार राहुल जगताप यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. त्या वेळीही आघाडीची चांगली परिस्थिती तालुक्‍यात असताना दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते श्रीगोंद्याकडे अजुनही लक्ष देत नाहीत. गेल्यावेळी हा मतदारसंघ आघाडीच्या नियोजनात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे होता. यावेळी हा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडावा, अशी मागणी आपण पक्षाकडे केली आहे. परंतु, त्यावर कुणीही काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे मतदारसंघ कॉंग्रेसला सोडायचा, की नाही याविषयी आमच्या मनात शंका आहे. एकीकडे कॉंग्रेस नेते मतदारसंघात दुर्लक्ष करीत असतानाच राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेतेही आम्हाला विश्वासात घेत नसल्याने त्यांनी नेमकी काय भूमिका घेतली आहे, याची माहिती नाही.''

नागवडे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. या प्रश्‍नावर बोलताना ते म्हणाले, ""अजून तसा कुठलाही विचार केलेला नाही. मात्र, दोन्ही कॉंग्रेसचे नेते दुर्लक्ष करीत असल्याने कार्यकर्ते शांत आहेत. अजूनही विधानसभा निवडणुकीबाबत आमच्याशी दोन्ही कॉंग्रेसचे नेते चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. तसे न झाल्यास कार्यकर्त्यांची चर्चा करुन अंतिम निर्णय घेऊ.''
----

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Both Congress not in touch: Rajendra Nagavade