esakal | दोघेजण कोरोनाबाधीत; सलगरे परिसर संपूर्ण सील 
sakal

बोलून बातमी शोधा

Both coronated; Seal the entire premises of Salgare

सलगरे : येथील दोघेजण कोरोनाबाधीत झाल्याचे त्यांच्या स्वॅबच्या अहवालावरुन आज स्पष्ट झाले. कोरोना बाधीत रुग्ण सापडलेला संपूर्ण परिसर प्रतिबंधीत करण्यात आला आहे. 

दोघेजण कोरोनाबाधीत; सलगरे परिसर संपूर्ण सील 

sakal_logo
By
अनिल पाटील

सलगरे : येथील दोघेजण कोरोनाबाधीत झाल्याचे त्यांच्या स्वॅबच्या अहवालावरुन आज स्पष्ट झाले. कोरोना बाधीत रुग्ण सापडलेला संपूर्ण परिसर प्रतिबंधीत करण्यात आला आहे. 
सलगरे येथील दोघांचे सोमवारी स्वॅबचे नमुने घेतल्यानंतर आज त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सलगरे परिसरात खळबळ उडाली. कोरोनाचा कहर सर्वत्र सुरु असताना सलगरे परिसरात आतापर्यंत आरोग्य विभाग, पोलिस आणि ग्रामपंचायत व नागरिकांच्या सतर्कतेमुळे कोरोना रुग्ण आढळून आला नव्हता चेकपोष्ट असल्याने बाहेरुन येणाऱ्यांवर नजर असल्यामुळे गावातील व्यवहार सुरळीतपणे सुरु होते. 

मात्र, चार दिवसापूर्वी दोघांचे स्वॅब पाझिटिव्ह आल्यानंतर रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणचा परिसर प्रतिबंधीत करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या कुटुंबातील आठ जण व बाहेरील कितीजण संपर्कात आली आहेत. याची माहिती आरोग्य विभागाकडून घेण्यात येत असल्याचे खंडेराजुरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. सुहास शिंदे यांनी सांगितले.

यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मगदूम, मंडल अधिकारी, सरपंच तानाजीराव पाटील, उपसरपंच सुरेश कोळेकर, ग्रामसेवक भिमराव पाटील, तलाठी सौ. तोडकर, पोलीस कॉन्स्टेबल पडळकर, देसाई, आरोग्य सेवक, सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी योग्य ती खबरदारी घेत रुग्ण सापडलेला परिसर प्रतिबंधीत करण्यात आला आहे. 

पाच दिवस कडकडीत बंद 
कोरोना रुग्ण सापडल्यानंतर सलगरेत खबरदारी म्हणून शनिवार (ता. 1) ते बुधवारअखेर (ता. 5) पाच दिवस अत्यावश्‍यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद करण्यात येणार आहेत. दूध संकलन गावामध्ये गर्दी न करता बाहेर योग्य त्या ठिकाणी करण्यात येणार असल्याचे मंडलाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, पदाधिकारी, आरोग्य, पोलिस, व्यापारी, यांच्यात झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. 

संपादन : प्रफुल्ल सुतार