साहित्य घोड्यावर लादून "त्या' दोघी अखंड चालत निघाल्यात

Both the women kept walking after loading the literature on the horse....
Both the women kept walking after loading the literature on the horse....
Updated on

आळसंद (जि. सांगली), ता. 11 : "आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी मानून, त्यांच्या कुशीत गुण्यागोविंदाने राहावे, एक तीळ सर्वांनी करंडून खावा, माणसानेच गाणे गावे माणसाचे'' असं "गोलपीठा' कार कवी नामदेव ढसाळ यांनी कवितेत म्हटलं आहे. गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या माणसांच्या जगण्याची कोरोनामुळे घडी विस्कटून गेली आहे. 

"कोरोना' चा प्रतिबंधासाठी देशभरात लॉकडाऊन जाहिर करण्यात आला. लॉकडाऊनची झळ सामान्यांपासून उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्यांना बसली. हातावर पोट असलेल्यांच्या जगण्याची घडी विस्कटली. त्यांचा प्रत्यय मेंढपाळ महिलांनाही बसला. माणदेशातील लता पुकळे कुकुडवाड व मीरा नरळे या जिगरबाज महिला गावाकडं जाण्यासाठी पायपीट करीत आहेत. 

लता व मीरा ह्या वाळवा तालुक्‍यातील शिरगावहून संसारपयोगी साहित्य घोड्यावर लादून गावकडं चालत निघाल्यात. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या. लोकांचे जगणं असहाय्य झाले. लता व मीरा संसार सावरण्यासाठी मुळगावी चालत निघाल्यात.

माणदेशातील मेंढपाळ पोटाची खळगी भरण्यासाठी सुपिक भागात जातात. लॉकडाऊन असल्याने ते मुळगावी निघाले आहेत. 

"कोरोना'मुळे कुणी गावात राहू देईना

मेंढ्या जगवण्यासाठी ऊसपट्ट्यातील कागलपर्यंत जातो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी गावाकडे जूननंतर गावाकडे येतो. "कोरोना'मुळे कुणी गावात राहू देईना. त्यामुळं गावाकडं निघालोय.

- मीरा नरळे, इरळी, ता. माण 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com