टेम्पो-ट्रॅक्टरच्या अपघातात सोलापूरचा तरुण ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

विनोद व त्याचे चार साथीदार विजयपूरवरून ट्रॅक्टरमध्ये मंडपाचे सामान परत घेऊन सोलापूरला येत होते. विजयपूर परिसरात झळकी येथे टेम्पोने मागून ट्रॅक्टरला येऊन धडक दिली.

सोलापूर : गोविंद तांडा कवठे (ता. उत्तर सोलापूर) येथील विनोद धर्मा पवार (वय 28) या तरुणाचा विजयपूर परिसरातील झळकी येथे अपघातात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली.

विनोद व त्याचे चार साथीदार विजयपूरवरून ट्रॅक्टरमध्ये मंडपाचे सामान परत घेऊन सोलापूरला येत होते. विजयपूर परिसरात झळकी येथे टेम्पोने मागून ट्रॅक्टरला येऊन धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टर उलटून खड्यात पडला. या घटनेत विनोद धर्मा पवार (वय 28 रा.गोविंद तांडा कवठे, ता. उत्तर सोलापूर) याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आले असून उपचार सुरू करण्यात आले आहेत.

विनोद पवार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a boy dies in accident of tempo and tractor