अक्कलकोटमध्ये भरदिवसा धाडसी घरफोडी

चेतन जाधव
मंगळवार, 7 जानेवारी 2020

फिर्याद कल्लप्पावाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेले बसवराज कल्लप्पा येलमिली (वय 53, रा. नूरनगर प्लॉट, बासलेगाव रोड, अक्कलकोट) यांनी उत्तर पोलिस ठाण्यात दिली. शिक्षक असलेले बसवराज येलमिली हे नेहमीप्रमाणे शाळेला गेले. त्यांच्या पत्नी श्रीदेवी बोरोटी आश्रमशाळेत नोकरीस असल्याने त्यासुद्धा सकाळी नऊ वाजता नोकरीस गेल्या.

अक्कलकोट (सोलापूर) : नोकरदार दांपत्य घर बंद करून नोकरीस गेल्यानंतर भरदिवसा अनोळखी चोरट्याने घराच्या दाराचा कडी-कोयंडा उचकटून प्रवेश करून सुमारे साडेबारा तोळे सोने व रोख 45 हजार रुपये अशा सुमारे दोन लाखांची धाडसी चोरी केली आहे. याप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. 7) गुन्ह्याची नोंद झाली आहे. ही घरफोडी सोमवारी सकाळी नऊ ते दुपारी तीन दरम्यान बासलेगाव रोडवरील नूरनगर येथे झाली. 
या घरफोडीची फिर्याद कल्लप्पावाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेले बसवराज कल्लप्पा येलमिली (वय 53, रा. नूरनगर प्लॉट, बासलेगाव रोड, अक्कलकोट) यांनी उत्तर पोलिस ठाण्यात दिली. शिक्षक असलेले बसवराज येलमिली हे नेहमीप्रमाणे शाळेला गेले. त्यांच्या पत्नी श्रीदेवी बोरोटी आश्रमशाळेत नोकरीस असल्याने त्यासुद्धा सकाळी नऊ वाजता नोकरीस गेल्या. दुपारी तीन वाजता बसवराज येलमिली हे बॅंकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी म्हणून अर्धी रजा काढून घरी आले होते. दाराजवळ गेल्यावर कडी-कोयंडा उचकटल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर घरात प्रवेश करून पाहिले असता घरातील कपाटात ठेवलेले सुमारे साडेबारा तोळे सोन्याचे दागिने व रोख 45 हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी उत्तर पोलिस ठाण्यात अनोळखी चोरट्याविरुद्ध रोख रक्कम व सोन्याच्या पाटल्या, बांगड्या, गंठण, लक्ष्मीहार, लॉकेट व अंगठी असे सुमारे साडेबारा तोळे सोन्याचा ऐवज अशी एकूण दोन लाख आठ हजार 500 रुपयांची चोरी केल्याची फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक नाळे तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brave robbery of the day in Akalkot