साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाच्या तयारीला ब्रेक...कशामुळे वाचा 

sugar factory.jpg
sugar factory.jpg

एरंडोली (सांगली)- शासनाच्या महसुली ऊत्पन्नाचा अर्थिक कणा समजला जाणारा साखर उद्योग कोरोनामुळे अडचणीत सापडला आहे. हंगाम समाप्ती वेळीच कोरोनाने थैमान घातल्याने हंगाम गडबडीत उरकण्यात आला. परंतु आगामी हंगामासाठी तांत्रिक दुरुस्तीला लॉकडाउनमुळे "ब्रेक' लागत आहे. 

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपल्यानंतर पुढील हंगामासाठीच्या तांत्रिक दुरुस्तीस सुरुवात होते. यामध्ये रोलर रिशेलींग करणे, टर्बाईन दुरुस्ती व साफसफाई,चेनची दुरुस्ती करणे, बॉयलरची साफसफाई तपासणी व दुरुस्ती बायलींग हाऊस साफसफाई व दुरुस्ती करणे यासह कारखान्यातील अन्य दुरुस्तीची कामे आताच करावी लागतात. दुरुस्तीसाठी लागणारे साहीत्य पंजाब,उत्तर प्रदेशसह बेंगलोर, पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापुर, अहमदनगर, औरंगाबाद या ठिकाणी मिळते. सध्या कोरोनामुळे हे साहित्य लवकर मिळेल याची शाश्वती नाही. शिवाय साहित्य उशिरा मिळाले तर दुरुस्तीची कामे वेळेत पुर्ण होणार नाहीत याचीही भिती आहे. तसेच ईलेक्‍ट्रीकल मोटर्स-पॅनेल बोर्डस, पॉवर टर्बाईन आदी दुरुस्तीची देखभाल करणारे लोक परराज्यातील, परजिल्यातील असल्याने ही मंडळी दुरुस्ती कामासाठी पोहोचू शकत नाहीत. ही कामे वेळेवर झाली नाही तर ब्रेकडाऊनचीही भिती निर्माण होत आहे. 

या सर्व बाबींचा गाळपावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. आगामी हंगामासाठी मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन होण्याची शक्‍यता आहे. साखर कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणात साखर शिल्लक असल्याने कर्ज आणि व्याजाचे हप्ते अदा होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे बॅंकांनीही पुर्वहंगामी कर्जे वेळेत दिली नाही तर नवीन माल मिळणार नाही. प्रामुख्याने साखर कारखान्यांच्या तांत्रिक दुरुस्ती साठी आणि पुर्व हंगामी कामासाठी लॉकडाऊनमुळे साहित्य, मजुर उपलब्ध होत नसल्याने साखर कारखान्यांच्या तांत्रिक दुरुस्तीला सध्या सुरुवात झाली असली तरी स्पेअर पार्ट मिळण्यावरच सर्व अवलंबून आहे. 

बॉयलरचे-एफडी आयडी फॅन्स, इतर ब्लोअर्स व रोटरी ईक्वीपमेंटस, सेन्ट्रीफुगल मशिन्सच्या बास्केटचे बॅलसिंग करणे ही कामे बाहेर करावी लागतात. त्यासाठी हे कोल्हापूर, लातूर किंवा बारामती येथे पाठवून बॅलेंसिंग करून आणावे लागतात. ही कामे वेळेत होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. 
तसेच बॉयलरची तपासणीची कामे,व दुरूस्ती आणि कॅलिब्रेशन, ईन्ट्रूमेंटस- फ्लो मीटर्स कॅलीब्रेशन, इलेक्‍ट्रीकल इन्स्पेक्‍शन आदी शासकीय नियमाप्रमाणे दरवर्षी करणे बंधनकारक आहेत. म्हणजे बॉयलरची तपासणी करून करावयाची आवश्‍यक कामे तसेच ईतर सर्व मशिनरीचे स्पेअर्स आणि जॉबवर्क यांचे मागणीपत्र भरणे, त्यानंतर निविदा मागवणे, दरपत्रके घेणे, किंमतीचे तुलनात्मक तक्ते तयार करणे, पर्चेस कमिटी मिटिंग घेणे व नंतरच पार्टीला ऑर्डर देणे या बाबी सहकारी साखर ऊध्योगाला बंधनकारक आहेत. 


त्यामुळे बाजार पूर्णपणे चालू झाल्यानंतरच साहित्य मिळणार आणि त्यानंतर कामे होणार यात खुप दिरंगाई होईल. साखर कारखान्यात लागणारे स्पेअर्स इतर कोणत्याही उद्योगात फारसे वापरले जात नसल्याने, तसेच बरेचसे कास्टिंग मटेरीयल असल्याने ते ऑर्डरबरोबर ड्राईंग आणि ऍडव्हान्स दिल्यानंतरच तयार केले जातात. त्यास किमान दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे ऐनवेळी मागणी करून स्पेअर्स वेळेत मिळणार नाहीत त्याचा परिणाम मशिनरीच्या देखभालीच्या कामावर होऊ शकतो. 
 

""स्पेअरपार्ट बरोबरच कोरोणाच्या धास्तीमुळे ऊस तोडणी मजुरांची ही येणाऱ्या हंगामात अडचण जाणवणार का हा प्रश्न कारखान्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे'' 
-सूर्यकांत पाटील, (कार्यकारी संचालक, मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना लिमिटेड) 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com