50 वर्षाची परंपरा खंडित; निनाईदेवीची यात्रा-उरूस रद्द 

बाजीराव घोडे
Sunday, 20 December 2020

शिराळा तालुक्‍यातील कोकरूड गावचे आराध्य दैवत व भाविकांचे श्रद्धास्थान श्री निनाईदेवी यात्रेस मंगळवार 29 डिसेंबर दत्त जयंतीपासून प्रारंभ होत आहे. मात्र यावर्षी संपूर्ण जगावर आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी यात्रा न करणेचा निर्णय घेतला आहे.

कोकरूड : शिराळा तालुक्‍यातील कोकरूड गावचे आराध्य दैवत व भाविकांचे श्रद्धास्थान श्री निनाईदेवी यात्रेस मंगळवार 29 डिसेंबर दत्त जयंतीपासून प्रारंभ होत आहे. मात्र यावर्षी संपूर्ण जगावर आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी यात्रा न करणेचा निर्णय घेतला आहे. हिंदू मुसलीम ऐक्‍याचा संदेश देणारी यात्रा व आलीशा बाबा उरूसास 1970 साली तत्कालीन सरपंच प्रतापराव देशमुख यांनी सुरवात केली. 

यात्रेचे यावर्षीचे 50 वे वर्ष आहे. मंगळवार 29 रोजी यात्रेस प्रारंभ होनार होता. 10 दिवस चालणाऱ्या यात्रेत अनेक धार्मिक कार्यक्रम व स्पर्धाचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षीची यात्रा कोरोनामुळे रद्द करणेत आली आहे. त्यामुळे स्थानिक जनतेसह आसपास गावातील यात्रेकरूंचा हिरमोड झाला आहे. मार्च महिन्यापासून कोरोना या महाभयंकर रोगाने संपूर्ण जगाला वेठीस धरले यामध्ये अनेक व्यावसाईक, नोकरदार व सामान्य जनता हैराण झाली. 

मार्च ते में दरम्यान होणाऱ्या गावागावातील अनेक ग्रामदैवतांच्या यात्रा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे यात्रावरती आवलंबुन असणाऱ्या व्यावसाईकांची यात्रा रद्द झालेमुळे व्यवहार ठप्प झाले. व त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. सध्य स्थितीला कोरोनाचा वेग मंदावला असला तरी दुसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तवली जात आहे. त्यामुळेही शासनाने गर्दी होणऱ्यां कार्यक्रमावर बंदी कायम ठेवली असून कोकरूड ग्रामपंचायतिने देखील शासनाच्या नियमांचे पालन करत यात्रा नं करणेचा निर्णय घेतला आहे. 

कोरोनाची लाट जरी ओसरत असली तरी भीती कायम आहे. त्यामुळे गर्दी करणारे कार्यक्रम होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागणार आहे. यासाठी आम्ही निनाई देवी यात्रेची गेली पन्नास वर्षाची परंपरा खंडित करत, शासन नियमांचे पालन करत यात्रा न करणेचा निर्णय घेतला आहे. 
- पोपट पाटील, उपसरपंच, कोकरूड.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breaking a 50-year tradition; Ninai Devi's Yatra-Urus canceled