ब्रेकिंग ः शरद पोंक्षे यांच्या गाडीवर नगरमध्ये दगडफेक, कारण... 

Breaking: Sharad Ponkshe's car is hit in the Ahmednagar
Breaking: Sharad Ponkshe's car is hit in the Ahmednagar
Updated on

नगर ः अभिनेता शरद पोंक्षे हे वादग्रस्त वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत असतात. त्यांना आज नगरमध्ये वेगळ्याच प्रसंगाला सामोरे जावं लागलं. त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. याची चर्चा नगरमध्ये वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडियातही याची चर्चा रंगली. 


अखिल भारतीय नाट्य परिषदेचे नाट्य संमेलन नगरमध्ये होणार आहे. त्याच्या नियोजनाच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, मुख्य कार्यवाह शरद पोंक्षे, सतीश लोटके, दिगंबर प्रभू, अशोक नारकर, सतीश शिंगटे, अमोल खोले, शशिकांत नजन आदी उपस्थित होते.

 
सावरकर यांचे काम महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा सरस काम आहे, असं वक्तव्य शरद पोंक्षे यांनी केलं होतं. त्यावरून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठा वाद उफाळला होता. या वक्तव्यामुळे महात्मा फुले व डॉ.आंबेडकरांचा अवमान झाल्याची भावनाही बहुजन समाजात होती. त्यातून सोशल मीडियात पोंक्षे यांच्याविरूद्ध राग व्यक्त केला जात आहे. 

पोंक्षे हे वादग्रस्त वक्तव्य करून जातीजातीत तेढ निर्माण करतात, असाही त्यांच्यावर आरोप होत असतो. मात्र, पोंक्षे हे आपल्या वक्तव्यावर ठाम असतात. त्यामुळे त्यांच्याविषयी राग आहे. याच रागातून पोंक्षे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची चर्चा आहे. 
पत्रकार परिषद संपल्यानंतर नाट्य परिषदेचे पदाधिकारी बाहेर आले. त्यावेळी त्यांना गाडीची काच फुटलेली दिसली. त्यामुळे ही चर्चा वाऱ्यासारखी शहरात पसरली. काहींनी लगेच सोशल मीडियात कमेंट सुरू केल्या. 
या प्रकाराबाबत पोलिस ठाण्यात कोणतीही फिर्याद दाखल नव्हती. 

तसं नाही काही राव... 
दगडफेक झालेली गाडी ही शरद पोंक्षे यांची नसून ती परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांची आहे. गाडीत त्यांची बॅग होती. त्यामुळे चोरीच्या उद्देशानेच कोणीतरी गाडीची काच फोडली असावी, असा खुलासा नगरचे नाट्यकर्मी सतीश लोटके यांनी "सकाळ'सोबत बोलताना केला. पोंक्षेंसंदर्भातील वादाची याला पार्श्‍वभूमी नसावी, असेही ते म्हणाले.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com