ब्रेकिंग...त्या नऊ रूग्णांची प्रकृती स्थीर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

सांगली : जिल्ह्यात नऊ कोराना बाधित रुग्णांची त्यांची प्रकृती स्थीर आहे. त्यांच्यात कोणतीही नवीन लक्षणे आढळली नाहीत. वैद्यकीय अधिकारी लक्ष देत आहेत व त्यांच्यावर उपचार करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे. 

सांगली : जिल्ह्यात नऊ कोराना बाधित रुग्णांची त्यांची प्रकृती स्थीर आहे. त्यांच्यात कोणतीही नवीन लक्षणे आढळली नाहीत. वैद्यकीय अधिकारी लक्ष देत आहेत व त्यांच्यावर उपचार करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे. 

ते म्हणाले,""जिल्ह्यात एकूण 49 लाकांचे स्वॅप तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी 9 रूग्णाचे स्वॅप पॉझीटीव्ह आले आहेत तर उर्वरीतांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. 12 व्यक्तींचा रिपोर्ट अद्यापही अप्राप्त आहे, तो उद्यापर्यंत प्राप्त होईल. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन शर्तीचे प्रयत्न करीत आहे. याला सर्वांनी साथ देणे आवश्‍यक आहे.'' 

डॉ. साळुंखे म्हणाले, ""काही खासगी दवाखाने बंद रहात आहेत याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्‍टरांवर महाराष्ट्र मेडीकल कौन्सीलकडील त्यांची नोंदणी रद्द करण्यापर्यंत जिल्हा प्रशासन कारवाई करू शकते. याची जाणीव डॉक्‍टरांनी ठेवावी. कटू कारवाई टाळण्यासाठी डॉक्‍टरांनी नोबल प्रोफेशनमध्ये आपण काम करत आहोत याची जाणीव ठेवून अशावेळी लोकांच्या आरोग्य सेवेसाठी पुढाकार घेऊन काम करणे अपेक्षित आहे. त्यामुळे दवाखान्यांना कुलपे लावून बंद ठेवू नयेत. अशाने आपली प्रतिमा चांगली राहणार नाही. शासकीय यंत्रणेतील डॉक्‍टरांनी अशा प्रसगांमध्ये पुढे येऊन काम करावे व खाजगी डॉक्‍टरांनी मागे रहावे हे निश्‍चितच खेदजनक आहे.'' 

 

...तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई 
काही डॉक्‍टर कर्मचारी दवाखान्यात येत नाहीत या सबबीवर दवाखाने बंद ठेवत आहेत. याबाबत बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे म्हणाले, ""आपण आपल्या दवाखान्याची ओळखपत्रे कर्मचाऱ्यांना द्यावीत. गरज पडल्यास हॉस्पीटलचे संचालक व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे ओळखपत्र देण्याचाही विचार सुरू आहे. पोलिस सोडत नाहीत असे कारण पुढे करून वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी बाहेर पडत नसतील तर त्यांच्यावरही आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल.'' 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breaking ... those nine patients is stable