ब्रेकिंग - आता कमाल झाली राव... नगरचे आणखी तिघे झाले बाधित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

िजल्ह्यात बाधितांची संख्या २४ झाली आहे. मात्र, सुदैवाने आतापर्यंत एकही व्यक्ती दगावलेली नाही. दोनजणांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

नगर - कोरोनाबाधितांच्या रिपोर्टने नगर जिल्ह्यातील लोक हवालदिल झाले आहेत. दररोज येणारा रिपोर्ट काळजाची धडधड वाढवित आहे. आज आलेल्या रिपोर्टनेही काळजाचा ठोका चुकवला. आज ३१ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणी अहवाल आले. त्यात तीन लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

तीन अहवालामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २४ झाली आहे. या तीन व्यक्ती अनुक्रमे ५४, ४८ व २७ वर्षाच्या तरूणाचा समावेश आहे. आज आलेले अहवाल नेमके कोणत्या तालुक्यातील आहेत. हे समजू शकले नाही.

बाधित झालेल्या दोन व्यक्ती या नगर शहरातील आलमगीरमधील आहेत. यापू्र्वीही तेथे कोरोनाबाधित आढळले आहेत. तिसरी व्यक्ती सर्जेपुरा भागातील आहे. आलमगीरमध्ये राहाणाऱ्या बाधित व्यक्ती या लागण झालेल्यांच्या संपर्कात आल्या होत्या. असे सांगण्यात आले.

या बाधित व्यक्तींच्या संपर्कात कोण आले आहे. याचा शोध प्रशासनाने सुरू केला आहे.  िजल्ह्यात बाधितांची संख्या २४ झाली आहे. यात श्रीरामपुर तालुक्यातील बाधित तरूणाचा समावेश नाही. कारण त्याच्यावर पुण्यात उपचार सुरू आहे. त्याच्यासह जिल्ह्यात २५जणांना आतापर्यंत बाधा झाली आहे. हा आकडा वाढता असला तरी, सुदैवाने आतापर्यंत एकही व्यक्ती दगावलेली नाही. दोनजणांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breaking - Three more Corona patents in Ahmednagar