विट्याचे सफाई कर्मचारी बनले प्रशिक्षित 

गजानन बाबर
Wednesday, 10 February 2021

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विटा नगरपरिषद विटा येथे दिव्यस्वप्न फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने सफाई कर्मचारी प्रशिक्षण पार पडले.

विटा : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विटा नगरपरिषद विटा येथे दिव्यस्वप्न फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने सफाई कर्मचारी प्रशिक्षण पार पडले. घनकचरा वर्गीकरण, ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, मैला प्रक्रिया, सांडपाणी व्यवस्थापन आदी विषयांवर प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देण्यात आले. दिव्यस्वप्न फाउंडेशन हे महाराष्ट्र मध्ये नगरपरिषद, नगरपंचायत व महानगरपालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापन व सफाई कर्मचारी यांनी आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी याबाबत प्रशिक्षण देणारी नामांकित संस्था आहे. 

सफाई कर्मचारी प्रशिक्षण उद्घाटनप्रसंगी विटा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष स्वच्छतेचे ब्रॅड अम्बिसिटर वैभव पाटील, नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, उपनगराध्यक्ष अजित गायकवाड, मुख्याधिकारी अतुल पाटील, आरोग्य सभापती, गजानन निकम यांच्या मार्गदर्शनखाली हे प्रशिक्षण घेण्यात आले. 
वैभव पाटील म्हणाले, "स्वच्छ सर्वेक्षण तथा स्वच्छ भारत अभियानांतर्गत विटा नगर परिषदेने देशपातळीवर तिचा सन्मान प्राप्त करत स्वच्छतेतून शहराचा चेहरा-मोहरा बदलला आहे आणि यासाठी विटा नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी अहोरात्र पणे कष्ट करत आहेत. 

दिव्यस्वप्न फाऊंडेशनचे प्रशिक्षक शिवराज जाधव,प्रकल्प प्रमुख ऐश्वर्या जोशी यांनी सफाई कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या शासकीय योजना व त्याचा लाभ याबाबत माहिती दिली. या प्रशिक्षण कार्यशाळेत कार्यालयीन अधिक्षक बाजीराव जाधव, गजानन निकम, आनंदा सावंत, राजू पाटील, नितीन चंदनशिवे, असलम शेख, रोहीत पवार, देवेंद्र ओझा, केदार जावीर, नदीम मुल्ला, कोमल हसबे, सलीम शेख यांनी विशेष योगदान दिले. 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brick cleaners became trained