esakal | नवधुचा गावदेव दर्शनासाठी बैलगाडीचा हट्ट... 
sakal

बोलून बातमी शोधा

bride decided to go in bullock cart for visit temple

अनेकजण आपल्या मुलीच्या लग्नासाठी वेगळेपण म्हणून, घोड्यांचा रथ, महागड्या गाड्या, हेलिकॉप्टर आणल्याची अनेक उदाहरणे आहेत.पण उच्य शिक्षित मुलीने आपल्या लग्नासाठी जुनी परंपरा जोपासण्यासाठी चक्क बैलगाडीतून गावदेव करण्याचा वडीलांच्याकडे हट्ट धरून तो पूर्ण ही केला.

नवधुचा गावदेव दर्शनासाठी बैलगाडीचा हट्ट... 

sakal_logo
By
शिवाजीराव चौगुले

शिराळा : अनेकजण आपल्या मुलीच्या लग्नासाठी वेगळेपण म्हणून, घोड्यांचा रथ, महागड्या गाड्या, हेलिकॉप्टर आणल्याची अनेक उदाहरणे आहेत.पण उच्य शिक्षित मुलीने आपल्या लग्नासाठी जुनी परंपरा जोपासण्यासाठी चक्क बैलगाडीतून गावदेव करण्याचा वडीलांच्याकडे हट्ट धरून तो पूर्ण ही केला. 

ही कहाणी आहे शिराळा तालुक्‍यातील पाडळेवाडी येथील दत्तात्रय बापू पाटील यांची कन्या स्नेहल हिच्या लग्नाची.स्नेहल ही लहानपणापासून मुंबईत वाढलेली.तिचे एम टेक पर्यंत शिक्षण झाले आहे.चांगल्या पगाराची नोकरी आहे. तिचा विवाह चंदगड तालुक्‍यातील शुभम यांच्याशी काल मंगळवारी झाला. लग्नाआधी गावातील देवांचे दर्शन घेऊन जाण्याची पद्धत आहे.

जुन्या पारंपरिक पद्धतीने नवरदेव अथवा नवरीमुलगी यांना देवदर्शनासाठी बैलगाडीतुन नेले जात असे. व्हारडी मंडळींसाठी बैलगाड्यांचा ताफा असायचा .आता काळ बदलला. आधुनिक पद्धतीने वारे वाहू लागल्याने महागड्या चारचाकी गाड्या,घोडे,रथ, हेलिकॉप्टर यांचा वापर लोक करू लागले आहेत. आता बैलांची जागा ट्रॅक्‍टरने घेतली.त्यामुळे बैलजोड्या कमी होऊन बैलगाड्या अडगळीत गेल्या.पण जुने ते सोने म्हणत.

आता पुनः बैलगाड्यांचे आकर्षक वाढू लागले आहे. शहरात असणाऱ्या मुलांना बैलगाडी कशी असते हे चित्रात पाहावे लागते.मग त्यात बसणे दूरच. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण. आपले लग्न इतरांच्या लक्ष्यात रहावे ही प्रत्येकाची अपेक्षा असते. ज्यांच्याकडे पैसा असतो ते लोक घोड्यांचा रथ,महागड्या सजवलेल्या गाड्या तर काहीजण हेलिकॉप्टर आणतात. आपणाकडे उच्य शिक्षण व पैसा असला तरी आपण गावदेव करताना बैलगाडीचा वापर करायचा असा हट्ट मुलीने वडीलांच्याकडे धरणे हे नवलच आहे. केवळ लेकीच्या हट्टासाठी बैलगाडी सजवून तो हट्ट पूर्ण करण्याचे काम पाडळेवाडी येथील पाटील कुटुंबीयांनी केले.तो तिचा बैलगाडीचा हट्ट हा शिराळा तालुक्‍यासाठी कौतुकाचा विषय बनला. 

बैलगाडीचा आनंद वेगळाच 
मी लहानपणापासून मुंबईत राहिले असले तरी बैलगाडी हे माझ्यासाठी वेगळे आकर्षण आहे.माझे गावदेव हे बैलगाडीतून व्हावे ही माझी अपेक्षा वडीलांच्याकडे व्यक्त केली.ती त्यांनी पूर्ण केली. आपल्या जुन्या परंपरा जोपासणे हे महत्वाचे आहे. 

loading image