पोलिस चौकशीत चौघाही संशयितांनी जमीन हद्दीच्या वादातून सत्यजित कांबळे याच्यावर कोयता आणि काठीने हल्ला केल्याची कबुली दिली.
सांगली : कर्नाळ (ता. मिरज) येथे जमीन हद्दीकरिता शेतात खांब रोवण्याच्या कारणावरून सख्ख्या चुलतभावावर कोयत्याने हल्ला करून त्याचा खून (Murder Case) करण्यात आला. सत्यजित विकास कांबळे (२२, रा. कर्नाळ) असे मृत युवकाचे नाव आहे. ग्रामीण पोलिसांनी (Sangli Rural Police Station) तत्काळ खुनाचा गुन्हा दाखल करत १२ तासांत चौघांना जेरबंद केले.