Brown Shrike Bird
esakal
अंकलखोप (सांगली) : गुलाबी थंडीत सातासमुद्रापारचे पक्षी निसर्गसंपन्न ‘कृष्णा’काठी येतात. असाच एक देखणा, चपळ आणि डोळ्यांत भरण्यासारखा तपकिरी खाटीक (Brown Shrike Bird) हा विदेशी पाहुणा प्रथमच पलूस तालुक्यात अवतरला आहे. आमणापूर येथील नागोबा कट्टा परिसरातील हिरवाईत पक्ष्याचे दर्शन झाले. निसर्गप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फिटले आहे.