esakal | #WeVsVirus : ब्राॅडबॅंड कनेक्शनसाठी आम्हांला संपर्क साधा : बीएसएनएल

बोलून बातमी शोधा

#WeVsVirus : ब्राॅडबॅंड कनेक्शनसाठी आम्हांला संपर्क साधा : बीएसएनएल

बीएसएनएलचे इंटरनेटची जोडणी हवी असल्यास संबंधित ग्राहकांना ते पूरविण्यात येत असल्याचे कळविण्यात आले आहे.

#WeVsVirus : ब्राॅडबॅंड कनेक्शनसाठी आम्हांला संपर्क साधा : बीएसएनएल
sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा ः कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सातारा जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात महानगरांमध्ये कार्यरत असणारा युवा वर्ग सातारा जिल्ह्यात आला आहे. वर्क फ्रॉम होम या धर्तीवर अनेक जण त्यांच्या गावा गावातून, शहरा, शहारातून काम करीत आहे. परंतु बहुतांश जणांना इंटरनेटची सुविधा असूनही अपेक्षित वेग न मिळणे, सुविधा उपलब्ध न होणे या अडचणींना सामोरे जावे लागले.

युवा वर्गाची ही अडचण ई- सकाळच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनास तसेच खासगी ऑपरेटर यांच्यापर्यंत पोहचविण्यात आली. कलम 144 मधून टेलिकॉम सर्व्हिसेस वगळल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली. दूरध्वनी, इंटरनेट सेवा सुरु रहावी त्या यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांना सेवा देता यावी यासाठी त्यांनी कामावार जाताना संबंधित कर्मचाऱ्यास कंपनीने दिलेले ओळखपत्र वापरणे आवश्‍यक आहे असे नमूद केले.

दरम्यान भारत संचार निगम लिमिटेडने देखील वर्क फ्रॉम या धर्तीवर जे काम करीत असतील आणि त्यांना बीएसएनएलचे इंटरनेटची जोडणी हवी असल्यास त्यांना ते पूरविण्यात येत असल्याचे कळविण्यात आले आहे. त्याबाबतची माहिती बीएसएनएलच्या अधिकारी यांनी दिली. ते म्हणाले व्यावसायिक भागीदारा मार्फत आम्ही वेगवान ऑप्टीकल फायबर इंटरनेट (FTTH) घेउन जोडणी देत आहोत. सातारा जिल्हातील विविध ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे. ज्यांना कोणाला नवीन इंटरनेटची जोडणी हवी आहे त्यांनी घराबाहेर न पडता आपल्यानजीकच्या ग्राहक केंद्राशी संपर्क साधता येऊ शकणार आहे.
 
दरम्यान ज्यांना आपला मोबाइल रिचार्ज करायचा आहे किंवा आपले मोबाइल, टेलीफोन अथवा ब्रॉडबॅंडचे बिल भरायचे असल्यास त्यांनीही घरा बाहेर न पडता MY BSNL हे App वापरुन आपले बिल भरु शकता. अथवा बीएसएनएलच्या अधिकृत फ्रंचायजीला कॉल करुन अथवा Google Pay अथवा PayTm करुन आपले बिल भरु शकता किंवा रिचार्ज करु शकता असे कळविण्यात बीएसएनएलने कळविले आहे.

भारत संचार निगम लिमिटेडच्या विविध गावांतून तुम्हांला इंटरनेट जाेडणी मिळू शकते. त्या गावातील सेवा देणारे खालील प्रमाणे ः

7385942676 -  सातारा शहर, गोडोली, सदर बाजार, एमआयडीसी, माहुली, कोरेगाव. 
7588685443 - लोणंद, खंडाळा 
9423263877 - कराड शहर, तसावडे, मलकापूर, ओगलेवाडी, सुपणे 
9273568285 - वडुज, पुसेगाव, दहिवडी 
7387879523 - सातारा शहर, गोडोली, सदर बाजार, एमआयडीसी 
7385882676 - अंभेरी, भडाले, चिमणगाव, देवर, कोरेगाव, कटापूर, वाथार किरोली, पेठ, किन्हाई, रहिमतपूर, शिरांबे, तडावळे, तारगाव, त्रिपुती, वाठार स्ट्रीट, वाघोली 
9226480540 - दत्तनगर (शाहूपुरी) 
9423264245 -  मेढा, कुडाळ 
8805559393 - राजवाडा  
9702584773 - वाई, पाचगणी 
9225802540 - देऊर, पळशी  लिंब, पेठ किन्हाई, सातारा रोड, वडूथ, वाढे
7972434545 - फलटण शहर 
9975336666 - मलकापूर 
7709441880 - शिरवळ 
7775910010 - पाेवई नाका
9421552882 - साखरवाडी 
8169258414 - अंगापूर, अतीत, खोजेवाडी 
7507699228 - वाठार स्टेशन
8605031888 - अतीत, नागठाणे, शेंद्रे
9421552882 - तरडगाव
7709441880 - शिरवळ
9158002200  वाई 

सातारा जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या पाेहचली दाेनवर

याबराेबरच खासगी ऑपरेटरमधील रजत ब्राॅडबॅंड देखील कार्यरत आहे. त्यांचे प्रतिनिधी अरीफ यांना देखील (9765666611) संपर्क साधू शकता. 

सातारकरांनाे आता तुमची साथ हवी आहे : जिल्हाधिकारी