
एसटीच्या फेऱ्या सुरू नसल्यामुळे हातात पास असूनही खासगी वाहतूक किंवा इतर पर्यायाने शाळा गाठावी लागत आहे.
मांगले (सांगली) : शिराळा एसटी आगारातर्फे कोरोणाचा ज्वर कामी होऊन शाळा महाविद्यालये, धार्मिक स्थळे, सभा समारंभ सुरू झाले तरी शिराळा तालुक्यातील काही मार्गावर एसटीच्या फेऱ्या पूर्ण क्षमतेने सुरू केल्या नसल्यामुळे ग्रामीण भागातील सामान्य प्रवाशांच्यासह शालेय विद्यार्थ्यांची ससेहोलपट सुरू आहे.
शिराळा ते वारणानगर मार्गावर विद्यार्थी व इतर प्रवाशांची मोठी संख्या नेहमीच असते, मांगले, शिराळा कोडोली येथील मोठे आठवडा बाजार भरतात, मात्र एसटीची वाहतूक सकाळच्या टप्प्यात एक दोन गाड्याच या मार्गावरून जात आहेत. वारणानगर येथे शाळा महाविद्यालयाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बरोबरच आणि शिराळा येथे शाळेला जाणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. शिराळा आगाराने मुलींना एसटीचे फ्री पास दिले आहेत. तर मुलांना मासिक पास दिले आहेत. मात्र एसटीच्या फेऱ्या सुरू नसल्यामुळे हातात पास असूनही खासगी वाहतूक किंवा इतर पर्यायाने शाळा गाठावी लागत आहे.
हेही वाचा - साहेब, तुमच्या उलटा नाही तर शिलेदार म्हणून काम करू -
शाळा, महाविद्यालये सकाळी 11 वाजता सुरू होतात आणि दुपारी चार वाजता सुटत आहे, विद्यार्थ्यांना सकाळी 11 च्या शाळेसाठी सकाळी आठ वाजता एसटी धरावी लागत आहे. त्यांनतर दुसरी गाडी या मार्गावर नाहीत त्याच बरोबर शाळा सुटल्यानंतरही वेळेत घरी येण्यासाठी एसटी बस नाही. सकाळी शाळेत गेलेला विद्यार्थी, विद्यार्थिंनी घरात पोहोचेपर्यंत पालकांचा जीव टांगणीला लागत आहे.
"शिराळा ते वारणानगर आणी वारणानगर ते शिराळा या मार्गावर फेऱ्या कमी आहेत हे वास्तव आहे. मात्र येत्या सोमवारपासून या मार्गावर फेऱ्या पुर्वरत सुरू करण्याच्यी दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात वरिष्ठांशी बोलणे झाले आहे."
विद्या कदम, आगार व्यवस्थापक
संपादन - स्नेहल कदम