आष्ट्यात अंदाजपत्रक सभा आरोपांनी गाजली

The budget meeting in Ashta was abuzz with allegations
The budget meeting in Ashta was abuzz with allegations

आष्टा (जि. सांगली) ः आजची अंदाजपत्रक सभा इतर चर्चांनी गाजली. घरकुल योजनेतून उभारलेली घरकुले सत्ताधारी नगरसेवकांनी पैसे घेऊन विकल्याचा आरोप विरोधी नेते वीर कुदळे यांनी केला. चौकशी करून कारवाई करा, अशी बाजू सत्ताधारी नेते झुंजार पाटील यांनी मांडली. कधी गंभीर, तर कधी खेळीमेळी असे वातावरण होते. 4 लाख 88 हजार 241 रुपयांच्या शिलकीसह 86 कोटी 66 लाख 441 रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. अर्थसंकल्पाचे वाचन पाच मिनिटात झाले. 

कोरोना पार्श्वभूमीवर करवाढ केलेली नाही. नागरिकांना दिलासा देणारा अंदाजपत्रक असल्याचे मत झुंजार पाटील यांनी व्यक्त केले. मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, नगराध्यक्ष स्नेहा माळी, उपनगराध्यक्षा प्रतिभा पेटारे उपस्थित होते. 

दर महिन्याला बैठक घ्या, घरपट्टी आकारणी, धनगर तलावातील बेकायदेशीर गाळे, मिळालेली बक्षिसे, अनुदान रकमा, व्याज, मक्तेदारीवरून चर्चा वाढत गेली. तरतुदी, काही बाबतीत न झालेला खर्च, कागदी घोडे, वाढीव तरतुदीवर दोन तास चर्चा झाली. अनेक बाबींवर अंदाजपत्रक वाढीव तरतूदीच्या सूचना मांडण्यात आल्या. कुदळे यांनी विविध विषयांवर प्रश्न उपस्थित केले. 

मुख्याधिकारी डॉ. चव्हाण यांनी उत्तरे दिली. अर्जुन माने यांनी पदे भोगू नका नागरिकांच्या हिताचे निर्णय घ्या, अशा सूचना केल्या. घरकुले विक्रीचा मुद्दा गाजला. विशाल शिंदे, धैर्यशील शिंदे, शेरनवाब देवळे, जगन्नाथ बसुगडे, विजय मोरे, अर्जुन माने, विकास बोरकर, तेजश्री बोंडे, पुष्पलता माळी, मंगल सिद्ध, संगीता सूर्यवंशी उपस्थित होते. 

घरकुले पालिकेने ताब्यात घ्यावीत

सरकारच्या निधीतून घरकुले बांधून मिळाली. काही नगरसेवकांनी पाच लाखांपुढे रकमा घेऊन ती विकलीत. संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा. घरकुले पालिकेने ताब्यात घ्यावीत. 

- वीर कुदळे, विरोधी गटनेते 

कुठलीही करवाढ केलेली नाही

घरकुलांची चौकशी करावी. दोषींवर फौजदारी करावी. अंदाजपत्रकात कुठलीही करवाढ केलेली नाही. जनतेला दिलासा देण्याचे काम केले आहे.'' 

- झुंजार पाटील, नगरसेवक 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com