वऱ्हाडासाठी चार चाकी आली अन् बैलगाडी मात्र इतिहासजमा झाली

bullock cart existence from marriage stop from 2007 in sangli
bullock cart existence from marriage stop from 2007 in sangli
Updated on

झरे (सांगली) : माणदेशात पूर्वीपासून लग्न समारंभासाठी बैलगाडी वापरली जायची. नवरी मुली व कुरोली साठी एक बैलगाडी तर वऱ्हाडसाठी बाकीच्या बैलगाड्या वापरल्या जायच्या. परंतु 2007 नंतर लग्नासाठी बैलगाडीतून वऱ्हाड आलेले कुठेही दिसत नाही. बैलगाडीतून वऱ्हाड आणणे इतिहासजमा होऊ लागलेय. 

माणदेशी भागात पूर्वीपासून लग्नासाठी बैलगाडीचा वापर केला जायचा. बैलजोडीला धुऊन, झुला घालून शिंगाला शेंब्या घालत असत. बैलांना रंगाने रंगवले जात असे. पायाला शिंगाला रिबिन बांधल्या जात. गळ्यांत घुंगर माळा बांधत. वऱ्हाड घेऊन बैलगाडी जात असताना घुंगराचा आवाज अर्ध्या किलोमीटरवर जायचा. बैलाच्या मालकाला कोसल्या फेटा नेसलेला असायचा. लग्न दोन ते तीन दिवस चालत असे. 

लग्नात केळीची खुंट बैलगाडीत वाजत गाजत घेऊन येऊन मंडपात केळी बांधल्या जात असे, अशी पूर्वीपासून परंपरा आहे. अलीकडच्या काळात वऱ्हाडासाठी बैलगाडी वापरलेली दिसत नाही. आधुनिक काळात प्रत्येकाकडे दुचाकी वाहन आलेय. नवऱ्या मुलीला आणायचं म्हटलं, तर चार चाकी वाहनाने आणले जात आहे. 

बैलगाडीचा वापर कोणीही करत नाही. नव्हे तर बैलगाडीच इतिहास जमा होऊ लागलीय. सध्या लग्नकार्यात वेगळं काही असावं म्हणून बैलगाडीचा वापर केला जाईल. कुठे तरी लग्नांत काहीतरी वेगळं असावं म्हणून वरातीसाठी बैलगाडीचा वापर कुठे तरी चुकून होताना दिसत आहे. 

वेगळेपणासाठी वापर 

लग्नात वापरली जाणारी बैलगाडी इतिहास जमा होत आहे. सध्या वेगळेपणासाठी बैलगाडी वापरली जात आहे. 

"सन 2000 पर्यंत लग्नात बैलगाडीचा वापर केला जात होता. नंतरच्या काळात प्रमाण कमी झाले आहे. आता हौस म्हणून वापर होतोय."

- दिलीप खलारी, शेतकरी 

"सन 2007 पर्यंत तुरळक स्वरूपात बैलगाडीचा वापर होत होता. नंतरच्या काळात वापर झालेला दिसत नाही."

- गोरख नवळे, छायाचित्रकार 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com