Bullock Cart Race : खासदार-आमदारांच्या 'या' गावात 37 लाखांच्या शर्यतींचा थरार; बैलगाडीसाठी 'इतक्या' लाखांचं बक्षीस

एकूण ३७ लाखांच्या बक्षिसांच्या शर्यतींचा थरार अनुभवण्यासाठी शौकिन उत्सुक आहेत.
Bireswar Yatra at Examba Jolle Group Bullock Cart Race
Bireswar Yatra at Examba Jolle Group Bullock Cart Raceesakal
Summary

शर्यतीच्या मैदानाची पाहणी करण्यासाठी कर्नाटक-महाराष्ट्रातील गाडीमालकांनी येथील मैदानाची अनेकदा पाहणी केली आहे.

चिक्कोडी : एकसंबा येथील बिरेश्वर यात्रेनिमित्त (Examba Bireswar Yatra) जोल्ले ग्रुपच्या वतीने (Jolle Group) राष्ट्रीय पातळीवरील बैलगाडी व घोडागाडी शर्यती रविवारी (ता. ११) सकाळी नऊ वाजता होणार आहेत. बैलगाडीसाठी (Bullock Cart Race) ११ लाखांचे पहिले बक्षीस आहे. एकूण ३७ लाखांच्या बक्षिसांच्या शर्यतींचा थरार अनुभवण्यासाठी शौकिन उत्सुक आहेत. या शर्यतीसाठी मैदानाची सज्जता पूर्ण झाली आहे.

शर्यत सुटण्याच्या ठिकाणी दोन्ही बाजूला शौकिनांना बसण्यासाठी गॅलरीची व्यवस्था करण्यात आली असून मुख्य व्यासपीठ उभारले आहे. सकाळी ९ पासून घोडागाडी शर्यती सुरू होणार आहेत. त्यानंतर कर्नाटक (Karnataka) मर्यादित बैलगाडी शर्यत व त्यानंतर खुल्या गटातील बैलगाडी शर्यत होणार आहे. शर्यत सुटण्यासाठी सर्व मैदान लाल माती टाकून पाणी मारून सज्ज करण्यात आले आहे.

Bireswar Yatra at Examba Jolle Group Bullock Cart Race
'कोणी कितीही प्रयत्न केले, तरी मी भाजपमध्ये जाणार नाही'; माजी उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

एक किलोमीटर प्रशस्त मैदानावरून शर्यती सुटल्यानंतर त्या मुख्य मार्गावर लागणार आहेत. शर्यतीच्या मैदानाची पाहणी करण्यासाठी कर्नाटक-महाराष्ट्रातील गाडीमालकांनी येथील मैदानाची अनेकदा पाहणी केली आहे. त्यानुसार बैलांची तयारी करून घेण्यात आली आहे. जोल्ले ग्रुपच्या पुढाकाराने व एकसंबा बिरदेव यात्रेनिमित्त शर्यत कमिटीच्यावतीने या शर्यती होत आहेत.

Bireswar Yatra at Examba Jolle Group Bullock Cart Race
Hasan Mushrif : लोकसभा निवडणूक कधी आणि किती टप्प्यांत होणार? पालकमंत्री मुश्रीफांनी दिली महत्त्वाची अपडेट

बैलगाडी शर्यतींच्या खुल्या गटासाठी प्रथम ते चतुर्थ क्रमांकास अनुक्रमे अकरा लाख, पाच लाख, तीन लाख आणि दोन लाख रूपयांचे बक्षीस आहे. कर्नाटक मर्यादित बैलगाडी शर्यतीसाठी अनुक्रमे पाच लाख, तीन लाख, दोन लाख व एक लाख रूपये अशी बक्षीसे आहेत. खुल्या घोडागाडी शर्यतीसाठी अनुक्रमे एक लाख, ७५ हजार, ५० हजार आणि २५ हजार अशी बक्षीसे दिली जाणार आहेत. कर्नाटक मर्यादित घोडागाडी शर्यतीसाठीही अनुक्रमे एक लाख, ७५ हजार, ५० हजार व २५ हजार रुपये अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com