
कडेगाव : पाडळी (ता.कडेगाव) येथे बैलगाडी शर्यतीदरम्यान नियंत्रण सुटलेल्या बैलगाडीच्या धडकेत एका जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ५ एप्रिल रोजी येथे घडली. याप्रकरणी चिंचणी- वांगी पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल झाला असून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत बाळू बापू पाटोळे (रा. पाडळी, ता. कडेगाव) हे या दुर्घटनेत जखमी होऊन उपचारांदरम्यान मृत्युमुखी पडले. ही बैलगाडी शर्यत पाडळीतील यात्रा कमिटीमार्फत परवाना न घेता आयोजित करण्यात आली होती.