आंब्याच्या रोपांना गुच्छा रोग; लाखोंचे नुकसान 

सदाशिव पुकळे
Monday, 15 February 2021

अर्जुनवाडी (ता. आटपाडी) येथे आंब्याच्या रोपांना गुच्छा रोग झाला आहे. झाडांची वाढ खुंटली आहे. या रोगांत गाठ तयार होते. पालवी फुटू शकत नाही. रोप नपुंसक होते. प्रादुर्भाव इतर रोपांवरही होतो. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. 

झरे : अर्जुनवाडी (ता. आटपाडी) येथे आंब्याच्या रोपांना गुच्छा रोग झाला आहे. झाडांची वाढ खुंटली आहे. या रोगांत गाठ तयार होते. पालवी फुटू शकत नाही. रोप नपुंसक होते. प्रादुर्भाव इतर रोपांवरही होतो. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. 

अजित खरात यांनी जुलै 2020 मध्ये मलकापुर (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथून 800 केसर आंब्याची रोपे आणून लावली. लावली. अन्य चार शेतकऱ्यांनी 3 हजार 600 रोपांची लागवड केली. रोपांना गुच्छा रोग झाला आहे. फवारण्या केल्या तरी रोग हटत नाही. फांदी कापली तरी दुसऱ्या ठिकाणी तो रोग उद्भवतो, अशी स्थिती आहे. शेतकऱ्यांचा खर्च वाया जाण्याची भिती आहे. 

श्री. खरात यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे, की शासन मान्यताप्राप्त नर्सरी शैलेश नर्सरी मलकापूर (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथून 800 आंबा रोपे रोखीने आणली. ती गट नंबर 13, 48 मध्ये लावली. मात्र नुकसान सहन करावे लागत आहे. अन्य शेतकऱ्यांचीही फसवणूक थांबवावी. 

नर्सरीतूने बोगस, मिक्‍स व गुच्छ रोग रोगसंक्रमित रोपे दिली आहेत. लाखोंचे नुकसान झाले आहे. भरपाई मिळावी. 
-अजित खरात शेतकरी 

याच वर्षी गुच्छा रोग आला. आंबा पीक तज्ञांनाच उपाय सापडलेला नाही. आम्ही तरी काय करणार ? 
-शैलेश नर्सरी, मलकापूर. 

अजित खरात यांचा तक्रार अर्ज आला आहे. अन्य चार शेतकऱ्यांचे तक्रारी अर्ज घेऊन वरिष्ठांना कळवणार आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निश्‍चित प्रयत्न करू. 
-पोपट पाटील, तालुका कृषी अधिकारी 

 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bunch diseases of mango seedlings; Loss of millions