
सांगली : शहरातील विश्रामबाग आणि सांगलीवाडी परिसरात असलेल्या अपार्टमेंटमधील बंद फ्लॅट दिवसाढवळ्या फोडून चोरट्यांनी घरफोडी केली. दोन्ही घरांत ठेवलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ४ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी अभिजित विजय नाईक (वय ३१ रा. विजयनगर) यांनी विश्रामबाग तर अश्विनी अनुराग पाटील (३७, रा. सांगलीवाडी) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एकाच दिवशी शहरातील दोन ठिकाणी भरदिवसा घडलेल्या या घरफोडीच्या घटनेने खळबळ उडाली आहे.