गुन्हे अन्वेषण पोलिसाच्या घरावरच चोरट्यांचा डल्ला 

प्रमोद जेरे
Sunday, 27 December 2020

सांगली जिल्हा पोलिस दलात जिल्हा गुन्हा अन्वेषण विभागात काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याच्या घरावरच चोरट्यांनी डल्ला मारला.

मिरज : सांगली जिल्हा पोलिस दलात जिल्हा गुन्हा अन्वेषण विभागात काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याच्या घरावरच चोरट्यांनी डल्ला मारला.

चोरट्यांनी तब्बल सव्वा लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि पंचवीस हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी संबंधित पोलिस कर्मचारी महादेव तुळशीराम धुमाळ (वय 38) यांनी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्याशिवाय श्वानपथकही आणि ठसे तज्ज्ञानांही घटनास्थळी बोलावण्यात आले. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महादेव धुमाळ हे सांगलीस जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखेत हवालदार पदावर कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते या पथकात काम करीत आहेत. 22 डिसेंबर ते 24 डिसेंबर (गुरुवार) या दरम्यान धुमाळ यांचे घर बंद होते. आणि याच कालावधीत त्यांच्या घरी ही चोरी झाली.

त्यांच्या घराच्या खिडक्‍यांची ग्रिल तोडून चोरट्यांनी खिडक्‍यांचे सरकते दरवाजे सरकवून घरात प्रवेश केला आणि घरातील सोन्याच्या साखळ्या, अंगठ्या, कानातील रिंग जोड, चांदीचे कडे, मासोळ्या आणि पंचवीस हजार रुपयांची रोख रक्कम असा तब्बल 1 लाख 13 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

ही चोरी झाल्याचे निदर्शनास येताच श्री. धुमाळ यांनी तातडीने महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चोरीच्या ठिकाणी तातडीने पोलिस उपअधीक्षक आशोक वीरकर, यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. याशिवाय ठसे तज्ज्ञांसह श्वान पथकासही आणण्यात आले. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The burglary took place at the house of the criminal investigation police