इस्लामपूर : पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर (Pune-Bangalore Asian Highway) मध्यरात्री नवीकोरी एसटी बस (ST Bus) बंद पडली आणि भरधाव वाहनांच्या अपघाताच्या भीतीने चालकाने पाठीमागून येणाऱ्या अन्य वाहनांना मोबाईल टॉर्च दाखवत रात्र जागून काढली. काल रात्री उशिरा हा प्रसंग चंदगड आगाराच्या बस चालकावर आला.