सांगली : माई घाटावर कृष्णा नदीत (Krishna River) पोहणाऱ्यांची रोजची गर्दी... आज ही शंभरभर लोक पोहायला आले होते. पहाटे साडेपाच ते पावणेसहाच्या सुमारास एकजण नदीपत्रात पोहत होता. तेवढ्यात एक अजस्त्र मगर (Crocodile) आली. थंडी आणि अंधारात त्यांना समजलेच नाही. त्यांनी झटकण्याचा प्रयत्न केला, पण मगरीने पाय जबड्यात धरला अन् चावा घेतला.