विधानसभा प्रचारासाठी दिग्गजांची सोलापुरात मांदियाळी

विधानसभा प्रचारासाठी दिग्गजांची सोलापुरात मांदियाळी

सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी सोलापुरातील आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, खासदार असुद्दीन ओवैसी यांचे दौरे ठरले आहेत. 7 ऑक्‍टोबरला ओवैसी, 10 ऑक्‍टोबरला अमित शहा, 12 ऑक्‍टोबरला उध्दव ठाकरे सोलापुरात येणार आहेत.

दरम्यान, काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहूजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकरही सोलापुरात येणार आहेत.

सोलापुरातील शहर उत्तर (विजयकुमार देशमुख), दक्षिण सोलापूर (सुभाष देशमुख) हे दोन मतदारसंघ भाजपकडे तर माढा (पृथ्वीराज सावंत, संजय कोकाटे), मोहोळ (नागनाथ क्षिरसागर), करमाळा (रश्‍मी बागल), शहर मध्य (दिलीप माने), सांगोला (शहाजी पाटील), बार्शी (दिलीप सोपल) हे मतदारसंघ शिवसेनेला आणि अक्‍कलकोट (सचिन कल्याणशेट्टी), पंढरपूर-मंगळवेढा (सुधाकर परिचारक) हे मतदारसंघ रयतक्रांतीला व माळशिरस (राम सातपुते) हा मतदारसंघ रिपाइंला देण्यात आला आहे. या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षातील दिग्गज नेत्यांचे दौरे फायनल झाले आहेत. एमआयएमने शहर मध्य (फारूख शाब्दी), शहर उत्तर (अतिष बनसोडे), दक्षिण सोलापुरातून (अमितकुमार अजनाळकर) व सांगोला या उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार ओवैसी यांचा दौरा निश्‍चित झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडे मोहोळ (यशवंत माने), करमाळा (संजय पाटील), माळशिरस (उत्तमराव जानकर), बार्शी (निरंजन भूमकर), पंढरपूर- मंगळवेढा (भारत भालके), सांगोला (दिपक साळुंखे), शहर उत्तर (मनोहर सपाटे), शहर मध्य (जुबेर बागवान), माढा (बबनराव शिंदे) तर कॉंग्रेसकडे अक्‍कलकोट (सिध्दाराम म्हेत्रे), शहर मध्य (प्रणिती शिंदे), दक्षिण सोलापूर (बाबा मिस्त्री) यांच्या प्रचारासाठीही दिग्गज सोलापुरात येणार आहेत.

उमेदवारांकडून एक कोटींची थकबाकी जमा 
सोलापुरातील 11 विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजप, एमआयएम, वंचित बहूजन आघाडी, मनसे, रयतक्रांती, रिपाइं, शेकापसह 285 अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून अर्ज भरलेल्या उमेदवारांकडून सुमारे एक कोटी रुपयांपर्यंतची थकबाकी जमा झाल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com