हा कालवा नाही... कचरा कुंडी 

Canalchi kacharakundi
Canalchi kacharakundi

श्रीरामपूर : शहराच्या उत्तर व दक्षिण बाजूने जाणाऱ्या कालव्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. त्यामुळे कालव्यांना कचराकुंड्यांचे स्वरूप आले आहे. कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरून कालव्यालगतच्या लोकवस्तीसह व्यावसायिकांचेही आरोग्य धोक्‍यात आले आहे. पाटबंधारे विभाग अथवा पालिकेने कचरा उचलून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. 

नॉर्दन ब्रॅंच येथून साठवण तलावाकडे, तसेच साई मंदिराकडून अशोकनगरकडे दोन कालवे जातात. दोन्ही कालव्यांच्या बाजूला लोकवस्ती आहे. या वस्तीत कचरा उचलण्यासाठी घंटागाडी येत नाही. त्यामुळे येथील नागरिकांसह फळविक्रेते कालव्यातच कचरा टाकतात. प्लॅस्टिक पिशव्या, खरकटे अन्न, पूजेचे निर्माल्य, फळांची सालपटे, केस आदी कचऱ्याने कालवा व्यापला आहे. त्यास कचराकुंड्यांची अवस्था आली आहे. 

साठवण तलावात दूषित पाणी 
रस्त्यावर, मैदानावर टाकलेल्या प्लॅस्टिक पिशव्या वाऱ्याने उडून कालव्यात जातात. कचऱ्यातील पदार्थ खाण्यासाठी भटकी कुत्री, डुकरे फिरतात. त्यामुळे कचरा इतस्ततः पसरून दुर्गंधी सुटते. परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. कालव्याला पाणी आल्यानंतर हा कचरा पुढे वाहून जातो; परंतु कालव्याचे पाणी पालिका, तसेच बेलापूरच्या साठवण तलावात जाते. त्यातील पाणीही दूषित होते. तेच पाणी नागरिकांना प्यावे लागते. त्यातून आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. पालिका प्रशासन अथवा पाटबंधारे विभागाने याची दखल घेण्याची आवश्‍यकता आहे. आवर्तनाचे पाणी येण्यापूर्वी कचरा उचलून कालव्याची साफसफाई करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे. 

जबाबदारी पालिकेची 
कालव्यातील कचरा उचलण्याची जबाबदारी पालिकेची आहे. कचरा उचलण्यासंबंधी पालिकेला पत्र दिले आहे. त्यांनी तो उचलला पाहिजे. 
- योगेश जोर्वेकर, उपअभियंता, पाटबंधारे विभाग 

लवकरच कालव्यांची सफाई 
आरोग्य व पाणीपुरवठा विभागाकडून कालवा साफसफाईची मोहीम हाती घेतली जाणार आहे. कालव्यातून साठवण तलावात पाणी जात असल्याने नॉर्दन ब्रॅंच ते मिल्लतनगर व गोंधवणी पुलापर्यंत व त्यानंतर बेलापूरकडील कालव्यांची सफाई केली जाणार आहे. 
- संजय आरणे, आरोग्य विभागप्रमुख, नगरपरिषद 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com