Vidhan Sabha 2019 : पठ्ठ्याने भरला चक्क हेलिकॉप्टर मधून येत उमेदवारी अर्ज (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

सांगोला जिल्हा हा शेतकरी कामगार पक्षाच्या गणपतराव देशमुखांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, सध्या हेलिकॉप्टर मधून येऊन उमेदवारी अर्ज भरणाऱ्या संजय पाटील यांचीच जास्त चर्चा सुरू आहे.
 

सांगोला : सांगोला जिल्हा हा शेतकरी कामगार पक्षाच्या गणपतराव देशमुखांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, सध्या हेलिकॉप्टर मधून येऊन उमेदवारी अर्ज भरणाऱ्या संजय पाटील यांचीच जास्त चर्चा सुरू आहे.

अजित पवारांचे निकटवर्तीय असणाऱ्या संजय पाटलांनी आज सांगोला मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस संजय पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पुण्याहून सांगोल्याला हेलिकॉप्टरने आले.

उमेदवार हेलिकॉप्टरने अर्ज भरायला येतोय हे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. मोठ्ठया साहेबांनी आदेश दिला तर पूर्ण ताकदीनिशी राष्ट्रवादीकडून मैदानात उतरणार असल्याचे संजय पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: candidate come from the helicopter and filed his nomination for assembly election