महामार्गावरती ऊस वाहतूक सुरू; अपघात टाळण्यासाठी रिफ्लेक्‍टर सक्तीची मागणी 

Cane transportation on highways resumes; Demand for reflector force to prevent accidents.jpeg
Cane transportation on highways resumes; Demand for reflector force to prevent accidents.jpeg
Updated on

इस्लामपूर (सांगली) : परिसरातील बहुतांशी साखर कारखाने सुरू झाले आहेत. पुणे-बंगरुळ आशियायी महामार्ग, पेठ-सांगली राज्य महामार्गावर ऊसवाहतूक करणाऱ्या वाहनांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता आहे. याकरिता ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना पाठीमागील बाजूस रिफ्लेकटर लावणे फार गरजेचे आहे. अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने रिफ्लेक्‍टर सक्ती सोबत वाहतूक शिस्तीचे पालन होत की नाही याची तपासणी करावी अशी मागणी होत आहे. 


सर्वोदय साखर कारखाना, हुतात्मा कारखाना राजारामबापू कारखाना साखराळे व वाटेगाव युनिट, वारणा कारखाना, कृष्णा कारखान्याच्या यंत्रणेमार्फत ऊस तोडणी केली जाते. या सर्व कारखान्यात गाळपासाठी आणला जाणारा ऊस पुणे-बंगरुळ आशियायी महामार्ग व पेठ-सांगली रोड वरून काही अंतर का होईना पण वाहतूक केला जातो. ऊस वाहतूक वाहनांची गती अत्यंत कमी असते. बऱ्याचवेळा या वाहनाचा घोटाळा झाल्याने महामार्गाच्या कडेला ती उभी केलेली असतात. राष्ट्रीय महामार्गावरची वाहने अत्यन्त सुसाट वेगाने जात असतात. ऊस वाहतूक करणारे वाहन मंद गतीने चालते.

त्याला रिप्लेकटर लावला नसेल तर ते वाहन लांबून दिसत नाही. ते सुसाट वाहन ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर आदळते व अपघात घडून येतो. त्या वाहनास किंवा थांबलेल्या ऊस वाहनास जर रिप्लेकटर असेल तर तर मोठा होणारा अपघात टळू शकतो. अनेक वेळा मोठे अपघात घडलेले आहेत. या करिता कारखान्यातील ऊस वाहतूक विभागाने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टर, बैलगाडी, ट्रक रिप्लेकटर बसवणे गरजेचे आहे.

ऊस वाहतूक ट्रॅक्‍टरमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावली जातात. ज्या मुळे पाठीमागुण येणाऱ्या वाहनांचा हॉर्न चा आवाज त्या चालकाला ऐकू येत नाही. यामुळे अपघात प्रमाण वाढत आहे.ऊस वाहतूक वाहनवर्ती प्रशिक्षित चालक असणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाच्या वाहतूक यंत्रणेने या बाबबीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com