झटपड श्रीमंतीच्या हव्यासापोटी शेतकऱ्यांकडून "गांजा' शेती 

राजू पुजारी 
Friday, 9 October 2020

श्रीमंतीच्या हव्यासापोटी शेतकरी गांजा या पिकाकडे वळताना दिसत आहे. गांजाची लागण करताना कमालीची गोपनीयता पाळली जाते. जत तालुक्‍यात अनेक गावांमध्ये ऊस, तूर आदी पिके लावली जातात.

संख : श्रीमंतीच्या हव्यासापोटी शेतकरी गांजा या पिकाकडे वळताना दिसत आहे. गांजाची लागण करताना कमालीची गोपनीयता पाळली जाते. जत तालुक्‍यात अनेक गावांमध्ये ऊस, तूर आदी पिके लावली जातात. यामध्ये गांजा लागवड केली जात आहे. तालुक्‍यातील उमराणी येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून 147 किलो वजनाचा पावणे 18 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केल्यानंतर तालुक्‍यातील गांजाची चोरी शेती पुन्हा चर्चेत आली आहे. 

सीमा भागातील अनेक गावात ऊस, मका, तूर, सूर्यफूल या पिकांतर्गत गांजा पिकाची लागवड केली जाते. पीक परिपक्व झाल्यानंतर त्याची पाने तोडून वाळत घातले जातात. कोणत्याही प्रक्रिया न करताच गांजा तयार होतो. गांजा विरोधी कारवाई करताना महसूल खात्यातील सक्षम अधिकारी घेऊन छापा टाकण्यात बंधनकारक असताना एकाही कारवाईस महसूल अधिकाऱ्याचा समावेश केला जात नाही. 

तसेच महसूल विभागातील तलाठी अण्णासाहेब शेतात जाऊन पीक पाहणी करण्याची असताना देखील अनेक अण्णासाहेब कार्यालयात बसूनच पीक-पाणी दप्तरी नोंद करताना दिसतात. महसूल विभागाचे वचक बसत नसल्यामुळे झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी गांजाची या अवैध मार्ग निवडताना दिसत आहेत. 

17 वर्षांनंतर मोठी कारवाई 
तत्कालीन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सुरेश पवार, उमदी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश पळसदेवकर यांनी कोंनतेव बोबलाद येथे 2003 मध्ये दोन ट्रकसह 63 लाखाचा गांजा हस्तगत केला होता. 2015 मध्ये गुन्हे अन्वेषण यांच्या पथकाने दरीबडची ,पाच्छापूर येथे 42 लाख 70 हजारांचा गांजा पकडला होता. तसेच संख येथे दीड -दोन महिन्यापूर्वी 5 लाख 72 हजाराचा गांजा पकडला होता. आता दोन दिवसात उमराणे येथे या वर्षातली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Cannabis" farming by farmers for the sake of instant wealth