अमित शहांची सभा उधळण्याचा इशारा देणाऱ्यांना घेतले ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 सप्टेंबर 2019

अमित शहा यांच्या सभेच्या पाश्वभूमीवर पाेलिसांनी विद्यार्थी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे यांच्यासह अनेकांना ताब्यात घेतले आहे. तर 'अमित शहा गो बॅक' चा इशारा देणारया भीम आर्मीचे पदाधिकार्यानाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

सोलापूर : भाजपच्या महाजनादेश यात्रेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आज दुपारी 4.30 वाजता सोलापुरात येत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी सोलापुरात आल्यावर विद्यार्थी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यानी काळे झेंडे दाखवून निषेध केला होता. तो अनुभव पाहून पोलीसांनी विद्यार्थी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे यांच्यासह अनेकांना ताब्यात घेतले आहे. तर 'अमित शहा गो बॅक' चा इशारा देणारया भीम आर्मीचे पदाधिकारीही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. 

दरम्यान, होटगी रोड ते शासकीय विश्रामगृह व जनादेश यात्रा मार्गावर, सभेच्या ठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दुपारी 3.40 वाजता शहा मुंबई विमानतळावरून सोलापुरला रवाना होणार असून 4.40 वाजता ते सोलापुरात येणार आहेत. त्यानंतर ते शासकीय विश्रामगृहातून सांयकाळी 6.20 वाजता महाजनादेश यात्रेत सहभागी होणार आहेत. तेथून त्यांची इंदिरा गांधी पार्क स्टेडीयम येथे सभा होणार आहे. साडेआठ वाजता सभा पार पडल्यानंतर ते शासकीय विश्रामगृहात मुक्कामी थांबणार आहेत. उद्या (सोमवारी) सकाळी 9.45 वाजता ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Captured those who warned to disrupt the amit shah rally in solapur