
सांगली : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्याबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्या पोस्ट समाज माध्यमात व्हायरल केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावीर आदगोंडा पाटील (नांद्रे, ता. मिरज) यांनी सांगली शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.